हैदराबाद: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने हैदराबादमध्ये न्यूझीलंडविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना १२ धावांनी जिंकला आहे. पण, तरीही एक खेळाडू असा आहे जो भारतीय संघासाठी या सामन्यात सर्वात मोठा खलनायक ठरला आहे. कर्णधार रोहित शर्माने या खेळाडूला संधी देऊन चुकीचा निर्णय घेतला. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात या फ्लॉप खेळाडूने संघाला सामना हरवण्यात कोणतीही कसर सोडली नव्हती. पण, टीम इंडियाने हा सामना १२ धावांनी जिंकून एक लाजिरवाणा पराभव टाळला आहे. हा खेळाडू अजून कोणी नाही तर ऑफस्पिनर वॉशिंग्टन सुंदर आहे.
dfdfdfdkfwfoefeoeo