Tokiyo : ही आहे जपानी व्हिस्की यामाझाकी-55. तिच्या नावपुढे 55 जो आकडा आहे त्याचा अर्थ ही व्हिस्की तयार करण्यासाठी तब्बल 55 वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधी लागला. लोक या दुर्मिळ प्रकारची व्हिस्की विकत घेण्यासाठी बोली लावतात आणि जास्तीत जास्त किंमत देऊन ती मिळवण्याचा प्रयत्न करतात.
एका लिलावात, यामाझाकीच्या 750 मिली बाटलीची कमाल बोली $780,000 म्हणजे सुमारे 6.5 कोटी रुपये होती.
Yamazaki-55 ही जपानमध्ये उत्पादित केलेली सर्वात जुनी आणि महागडी व्हिस्की आहे. ते बनवणाऱ्या कंपनीचे नाव बीम संटोरी आहे.
ही व्हिस्की 2020 मध्ये प्रथमच लाँच करण्यात आली. त्यावेळी लॉटरी पद्धतीने जपानच्या बाजारपेठेत त्याच्या केवळ 100 बाटल्या उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
2021 मध्ये उर्वरित जगासाठी आणखी 100 बाटल्यांचे उत्पादन करण्यात आले. ही व्हिस्की काही महागड्या सिंगल मॉल्टपासून तयार करण्यात आली आहे.
त्याच्या प्रचंड किंमतीचे एक कारण म्हणजे ती जगात मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहे. ही दारू 200 वर्षे जुन्या लाकडी पिंपांमध्ये साठवून तयार केली जाते.
या व्हिस्कीची बाटलीही एका विशिष्ट प्रकारच्या बॉक्समध्ये येते. हा बॉक्स जपानी मिझुनारा लाकडापासून बनवला आहे.