धुळेः जिल्ह्यातील बुध्द विहारांमध्ये वाचनालय सुरु करण्याची मागणी अजिंठा बुद्ध विहार आणि मेडीटेशन संस्थेने केली आहे.
जिल्हा हा बहुसंख्य मागासवर्गीयांचा जिल्हा आहे. त्यात सुशिक्षित तरुणांची शहरासह गावपातळीवर मोठी संख्या आहे. बऱ्याच ठिकाणी लोकवर्गणीतून व शासन निधीतून गावोगावी व शहरातही मोठ्या संख्येने बौद्ध विहार व समाज मंदिरे उभारली आहेत. येथील बौद्ध विहारांमध्ये शांततेचे व मैत्रीचे वातावरण असते. या बुद्धविहारात सुशिक्षित तरुणांसाठी (शहरातील व ग्रामीण भागातील) आपल्यामार्फत वाचनालय सुरु करण्यात यावे. सद्या काही समाजकंटक देशात अराजकतेचे वातावरण पसरवित आहेत. या बुद्धविहारात वाचनालय सुरु झाल्यास शहरातील व गावातील सर्व जाती-धर्माचे तरुण अभ्यासासाठी एकत्र येवून मैत्रीचे व बंधुतेचे नाते निर्माण होवून समाज प्रगतीशील
व्हावयास मदत होईल. सध्या सर्वत्र खाजगी व शासनाची नोकरभरती सुरु आहे किंवा सुरु होणार आहे. यामुळे बऱ्याच तरुणांना गावात वाचनालय नसल्यामुळे पैसे देवून इतर अभ्यासिकांमध्ये प्रवेश घ्यावा लागत आहे. आधीच बेरोजगारी आणि त्यातून या अतिरिक्त खर्चामुळे हे तरुण पुस्तकी ज्ञानापासून वंचित राहतात.
जिल्ह्यातील म. जिल्हाधिकाऱ्यांनी बौद्धविहारात वाचनालय सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. तो निर्णय अत्यंत स्तुत्य व समाज एकसंघ करणारा आहे.
सदर निवेदनाची तात्काळ दखल घेवून जिल्ह्यात बुध्द विहारात वाचनालय सुरु करण्याचा निर्णय घ्यावा.
निवेदन देताना आझाद समाज पार्टीचे प्रदेश कार्याध्यक्ष आनंद लोंढे, समाज समता संघाचे धुळे जिल्हाध्यक्ष किरण गायकवाड, वंचित बहुजन आघाडीचे धुळे जिल्हा संघटक शंकर खरात हे उपस्थित होते.