धुळेः शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, वंचित बहुजन आघाङीचे प्रकाश आंबेडकर यांच्यात काल महत्त्वपूर्ण चर्चा होऊन महाराष्ट्रात आगामी काळात दोघही पक्ष एकत्रीत पणे काम करतील, दोघ पक्षप्रमुखांनी युतीचा घेतलेल्या या निर्णयामुळे महाराष्ट्रात बहुजन वंचित व इतर मागासवर्गीयाना नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे, या निर्णयाच स्वागत करीत धुळ्यात जल्लोष करण्यात आला. आज वंचित बहुजन आघाङी व शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पङली या वेळी शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, महानगर प्रमुख धीरज पाटील तर वंचित बहुजन आघाडीचे संघटक शंखर खरात, नितीन महसदे, किरण गायकवाड राजदीप आगळे, फकरूद्दीन खाटीक, शाखिर खाटीक, आकाश बागुल, शकीर शेख हे उपस्थित होते. या पार पडलेल्या बैठकीत वंचित बहुजन आघाडी व शिवसेना यांच्या माध्यमातून एकत्रित काम करून आंदोलने उभी करण्यात येतील आणि दोन्ही पक्ष खांद्याला खांदा लावून धुळे जिल्ह्यात नवीन क्रांती करतील असे या बैठकीत चर्चा करून धुळे शहरातील जुनी महानगरपालिका चौका समोर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्या कङुन एकमेकांना पेढे भरवत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.