धुळे(dhule): अखिल भारतीय काँग्रेस (conges) कमिटीच्या आदेशानुसार २६ जानेवारी प्रजासत्ताक (republic day) दिनापासून “हात से हात जोडो” या अभियानाला सुरुवात झाली.
भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभूमीवर या “हात से हात जोडो” (hat se hat jodo) अभियानाला अतिशय महत्त्वपूर्ण अभियान म्हणून काँग्रेस पक्षाने राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. धुळे जिल्हा व धुळे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज ७४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभ मुहूर्तावर धुळे तालुक्यातील भोकर उपनगरात या अभियानाला आमदार कुणाल पाटील (mla kunal patil) यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी काँग्रेस नेते राहुल गांधी (rahul gandhi) यांनी देशवासियांना लिहिलेले पत्र आणि केंद्र सरकारच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने तयार केलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर वाडीभोकर रस्त्यावरील सर्व व्यावसायिकांना, येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना राहुल गांधी यांचे पत्र वाटण्यात आले. वलवाडी गावातून घराघरात हे पत्रक वाटून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी धुळे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष शाम सनेर, धुळे शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष डॉ. अनिल भामरे, पंचायत समितीचे माजी सभापती बाजीराव पाटील, छोटू चौधरी, अशोक पाटील, भटू चौधरी, महिला काँग्रेसच्या पदाधिकारी, स्थानिक नागरिक उपस्थित होते.