#dhule crime धुळेः येथील देवपूरात वाडिभोकर रोडवरील एका मंदिरात शुक्रवारी मध्यराञी चोरी झाली आहे. दुचाकीवरुन दानपेटी लांबविणारे दोघे चोर सीसीटीव्ही (cctv camera) कॅमेरात कैद झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
चोरांचे लक्ष्य आता मंदिरे
शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी घरफोडीच्या गुन्ह्यांचा सपाटा लावला आहे. त्यांनी आपला मोर्चा आता मंदिरांकडे वळविला आहे. धुळे शहरातील वाडीभोकर रोडवर असलेल्या उत्तरमुखी हनुमान मंदिरातील (hanuman tempal) दानपेटीच चोरट्यांनी चोरून नेली असल्याचे उघडकीस आले आहे. काल मध्यरात्रीच्या सुमारास दोघा चोरट्यांनी दुचाकीवरून येत ही दानपेटी चोरून नेली. दानपेटीत किती रोकड होती हे अजुपर्यंत स्षष्ट झाले नाही.
चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद
दानपेटी चोरी करतानाच्या सर्व हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्या असून आता देवपूर भागातील नागरिक या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करीत आहेत. उत्तरमुखी मारुती मंदिर अगदी रस्त्यावर आहे आणि त्यात काही अंतरावर देवपूर पोलिस स्टेशन असल्यामुळे या चोरीची अधिकच चर्चा होत आहे.