#dhule crime धुळेः शहरातील साक्री रोडवरील यशवंतनगरात पतीने पत्नीचा खून (dipali-kanade-murder) केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे.
अशी घडली घटना
दिपाली नागेश कानडे हिचा खून झाला आहे. दिपली आणि तिचा पती नागेश दगडू कानडे यांच्यात शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमाराला कौटूंबिक वादातून भांडण झाले. वाद विकोपाला गेल्याने त्याने पत्नीच्या डोक्यावर धारदार शस्ञाने वार करून गंभीर दुखापत केली. दिपलीला तात्काळ तिचा दिर गणेश दगडू कानडे यांनी हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. उपचारा दरम्यान डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच धुळे शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी घटनास्थळी धाव घेत संशयित पती नागेश कानडे यांच्या मुसक्या आवळल्या. घटनास्थळी गर्दी जमली होती.
प्रेमविवाह, तरीही खून
नागेश दगडू कानडे (#nagesh-kanade) आणि दीपालीचा आठ वर्षांपूर्वी आंतरजातीय प्रेम विवाह झाला होता. त्यांना 8 वर्षांचा एक मुलगाही आहे. गेल्या काही महिन्यांपासून नागेश कानडे याचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले.