#dhule accident धुळे : सावळदे (ता. शिरपूर) पुलावर (tapi nadi sawlde bridg) झालेल्या भीषण अपघाताची सखोल चौकशी करुन मृतांच्या वारसांना तसेच जखींना नुकसान भरपाई देण्याची मागणी भीम आर्मी (bhim army) भारत एकता मिशिनने (bharat ekta mission) केली आहे.
याबाबत सोमवारी जिल्हाधिकार्यांना (dm dhule) दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुंबई-आग्रा महामार्ग क्रमांक 3 वरील सोनगीर आणि शिरपूर या दोन टोलनाक्यांच्या वसुलीचा ठेका सन 2012 पासून धुळे-पळासनेर टोल वे प्रा. लि. (dhule-palasner tollway pvt. ltd. co.) या कंपनीने घेतला आहे. या दोन्ही टोलनाक्यांची हद्द धुळे येथील वडजाई पुलापासून ते पळासनेरपर्यंत आहे. या टोलनाक्याच्या हद्दीत येणार्या सावळदे ता. शिरपूर येथील तापी पुलावर दि. 23 जानेवारी रोजी रात्री ट्रक आणि क्रुझर गाडीचा अपघात झाला. या अपघातात ट्रक पुलाचा कठडा तोडून नदीत कोसळला. या अपघातात संपूर्ण ट्रकसह त्यामधील लोकांचा अद्यापही पूर्णपणे अंदाज लागु शकलेला नाही. क्रुझरमधील 20 ते 25 प्रवासी जखमी झाले. त्यातील चार ते पाच जण अत्यंत गंभीर अवस्थेत असल्याची माहिती मिळाली आहे.
अपघाताचे कारण काय, याबाबत तेथील नागरिकांकडून माहिती घेतली असता, असे समोर आले की, अपघाताच्या आधीपासून तापी पुलावर टोल प्रशासनाने खड्डा खोदला होता. या खड्ड्यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी टोल प्रशासनास वेळोवेळी मौखिक स्वरुपात दुरुस्तीबाबत कळविले होते. परंतु खड्डा बुजविण्याचे काम अनेक दिवसांपासून झाले नाही. हा खड्डा अपघाताच्या ठिकाणाहून जवळपास 50 ते 60 मीटर अंतरावर करण्यात आला होता. त्याच्या अवतीभोवती कुठलाही दिशादर्शक बोर्ड अथवा बॅरिकेटिंग केले नव्हते. त्यामुळे हा अपघात झाला आहे, असा अंदाज स्थानिकांनी व्यक्त केला आहे.
बेजबाबदार आणि कामात दुर्लक्ष करणार्या टोल प्रशासनाच्या हलगर्जीपणाुळे अनेक लोकांचा यापूर्वी व यावेळी जीव गेला आहे. त्यामुळे या अपघाताची सखोल चौकशी करुन टोल प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि मयतांच्या वारसांना तसेच जखमींना टोल प्रशासनाकडून नुकसान भरपाईसह आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी भीम आर्मीने केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे. निवेदनावर भीम आर्मी भारत एकता मिशिनचे जिल्हाध्यक्ष संजय चव्हाण यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.