धुळेः ‘स्त्रीवादा’चा एकूण समग्र वेध घेण्याचा अचूक प्रयत्न करीत भारतीय संस्कृतीच्या परिघातुन तिला बाहेर काढ़त स्वातंत्र्याच्या विवेकवादी, विद्रोही समतेच्या मुळ निवृत्तिच्या भूमिकेशी सशक्तपणे प्रतिबिंत करणारा समृद्ध ग्रंथ म्हणजे चित्रलेखा कौशल लिखित “आम्रपाली भगवान महावीर व बुद्ध” हे संशोधनात्मक पुस्तक होय.
नागपूर विद्यापिठाच्या तत्वज्ञान विभागाच्या माजी प्रमुख चित्रलेखा कौशल यानी लिहिलेल्या या ग्रंथास धुळयाचे प्रसिद्ध वक्ते, मानसतज्ञ, विधी अभ्यासक प्रा. डॉ. घन:श्याम पुंडलिक थोरात (pandit ghanshyam thorat) यांची अभ्यासपूर्ण, प्रदीर्घ अशी प्रस्तावना लाभली आहे. प्राचीन बौद्ध संस्कृतीपासून ते थेट ‘समिट फ़ॉर डेमोक्रेसी’पर्यंतच्या लक्षवेधी चितंन परामर्श यात घेण्यात आला आहे. सदर पुस्तकाचे प्रमोशन मॅककवरी विद्यापीठ, सिडनी ऑस्ट्रेलिया येथे करण्यात आले. (Macquarie University, Sydney, Australia) सिडनी सरकारच्या कार्यकारी प्रशासनात कार्यरत असलेले मोहित वर्मा (mohit varma) हे सिडनी येथे चित्रपट दिग्दर्शक व अभिनेते म्हणुन प्रसिद्ध आहेत. त्यातल्या त्यात विकास पवार (सोनार) (मंहिदळे, धुळयाचे भूमिपुत्र ) हे सिडनी येथे आयटी इंजीनियर व उत्तम बासरी वादक असून व्यामिश्र कलावंत आहेत. दोन्ही पूर्वाश्रमीचे प्रा. डॉ. पंडित घन:श्याम थोरात यांचे पठ्शिष्य आहेत. प्रा. डॉ. घन:श्याम थोरात यांना अलीकडेच किंगडम ऑफ टोंगा या देशाची कॉमनवेल्थ वोकेशनल इंटरनेशनल यूनिवर्सिटीची ट्राफिक सेंस व सामाजिक न्याय यावर असलेल्या मूल्यधिष्ठित व्यापक संशोधन चिंतन, प्रबोधन कार्याची ‘दखल’ म्हणून मानद पीचडी जाहीर झाली आहे.
विशेष म्हणजे परदेशात प्रकाशन झालेल्या या पुस्तकाचे संपादन राजदीप आगळे (rajdeep agale) यांनी केले आहे. प्रस्तावना प्रा. थोरात यांची आहे. दोघेही धुळ्याचे भूमिपुञ आहेत आणि यामुळे धुळे जिल्ह्याचा लौकीक वाढला आहे.