नाशिक (Nashik): गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत (nashik-padavidhar-election-2023) अखेर सत्यजीत तांबे यांनी विजयी निशाण फडकावले आहे. सत्यजीत तांबे (satyajit tambe) यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील (shubhangi patil) यांना २९४६५ इतक्या मताधिक्याने पराभूत केले. सत्यजीत तांबे यांनी ६८९९९ मतं मिळाली, तर शुभांगी पाटील यांना ३९५३४ मिळाली.
नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघासाठी पहिल्या पसंतीची सर्वाधिक ६८ हजार ९९९ मत मिळवून अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे विजयी झाले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे (ias radhakrushn game) यांनी तांबे यांना प्रमाणपत्र देवून विजयी उमेदवार म्हणून घोषित केले.
विभागीय आयुक्त गमे यांनी पहिल्या पसंतीच्या १ लाख २९ हजार ६१५ मतपत्रिकांची मोजणी पूर्ण झाल्याची घोषणा करत उमेदवारांना प्राप्त मतांची माहिती दिली. विजयी उमेदवारासाठी ५८ हजार ३१० मतांचा कोटा ठरविण्यात आला होता. सत्यजित तांबे यांनी निश्चित कोट्यापेक्षा १० हजार ६८९ मते अधिक प्राप्त केली.त्यांना ६८ हजार ९९९ मत प्राप्त झाली आहेत. एकूण मतमोजणी नतंर १ लाख १६ हजार ६१८ मत वैध ठरली तर १२ हजार ९९७ मत अवैध ठरल्याचे त्यांनी सांगितले.
मतमोजणी पूर्ण होऊन अहवाल भारत निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आला. आयोगाच्या परवानगीने गमे यांनी सत्यजित तांबे यांना विजयी उमेदवार म्हणून घोषित केले व त्यांना विजयी उमेदवाराचे प्रमाणपत्र प्रदान केले.
यावेळी निवडणूक निरीक्षक डॉ. निपुण विनायक (nipun vinayak), जिल्हाधिकारी नाशिक तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गंगाथरण् डी. (gangatharan d), जिल्हाधिकारी अहमदनगर तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले (dr. rajendra bhosale), जिल्हाधिकारी धुळे तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा (jalaj sharma), जिल्हाधिकारी जळगाव तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अमन मित्तल (aman mittal), जिल्हाधिकारी नंदूरबार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा खत्री (manisha khatri), सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त (प्रशासन) रमेश काळे (ramesh kale), उपायुक्त उन्मेष महाजन (unmesh mahajan) यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, मतमोजणी पर्यवेक्षक, सहपर्यवेक्षक उपस्थित होते.
वैध ठरलेल्या मतांपैकी एकूण १५ उमेदवारांना प्राप्त मते
शुभांगी भास्कर पाटील : 39534
रतन कचरु बनसोडे : 2645
सुरेश भिमराव पवार : 920
अनिल शांताराम तेजा : 96
अन्सारी रईस अहमदअब्दुल कादीर : 246
अविनाश महादू माळी : 1845
इरफान मो इसहाक : 75
ईश्वर उखा पाटील : 222
बाळासाहेब रामनाथ घोरपडे : 710
ॲड. जुबेर नासिर शेख : 366
ॲड.सुभाष राजाराम जंगले : 271
नितीन नारायण सरोदे : 267
पोपट सिताराम बनकर : 84
सुभाष निवृत्ती चिंधे : 151
संजय एकनाथ माळी : 187