मुंबई (mumbai): प्रजासत्ताक दिनी (Republic day) शाळेत आयोजित कार्यक्रमात भाषण करताना लोकशाहीची बिनधास्तपणे व्याख्या करणार्या त्या गोड मुलाचा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या मुलाच्या भाषणातील शब्दाशब्दात लोकशाहीची खरी व्याख्या स्पष्ट होते. त्याच्या शब्दांमधून व्यक्त होणार्या निरागस भावना जणू आपल्याच मनातल्या आहेत, ज्या आपण कधी व्यक्त करु शकलो नाहीत. त्यामुळे या मुलाच्या वक्तृत्वाला सलाम करावासा वाटतो. म्हणूनच या गोड मुलाला भेटण्याचा मोह राज्याच्या मुख्यमंञ्यांनाही (cm) आवरता आला नाही. कार्तिक वजीर उर्फ भुर्या (kartik vajir-bhurya) असे या मुलाचे नाव आहे. तो अंबड तालुक्यातील रेवलगाव येथील जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी वाटूर येथे भेट घेऊन त्याचे कौतुक केले. राजेश टोपे (rajesh topa) यांनीही त्याचा सत्कार केला होता.