सध्या जर आपण शेतीक्षेत्र असो किंवा कुठलेही क्षेत्र त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान सातत्याने येत असून त्याचा उपयोग त्या त्या क्षेत्राला होत असतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जर आपण कृषी क्षेत्राचा विचार केला तर कृषी क्षेत्र देखील आता हायटेक झाले असून अनेक प्रकारचे तंत्रज्ञान कृषी क्षेत्रामध्ये आले आहे. अनेक कृषी संशोधन संस्था आणि विविध कृषी विद्यापीठांनी या तंत्रज्ञान आणण्याकामी खूप महत्त्वपूर्ण योगदान पार पाडले आहे.
दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे शेतीमध्ये जे काही नवयुवक प्रवेश करीत आहेत ते देखील नवनवीन संकल्पना घेऊनच शेतीमध्ये उतरत असून याचा प्रत्यक्ष फायदा हा कृषी क्षेत्राला होताना दिसून येत आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीचा विचार केला तर पिकांच्या बाबतीत विविध किडींचा व रोगांचा प्रादुर्भाव व त्याचे नियंत्रण हे शेतकरी बंधूंसाठी खूप आव्हानात्मक काम असून त्यांच्या नियंत्रणासाठी सगळ्यात जास्त खर्च हा होत असतो. परंतु तरी देखील हे नियंत्रण व्यवस्थित पद्धतीने होत नाही व नुकसान व्हायचे ते होतेच. त्यामुळे या परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असे काम औरंगाबादच्या दोन नवयुकांनी केले आहे.
काय आहे या तरुणांचे संशोधन?
औरंगाबादच्या दोन नवयुकांनी असेच एक भन्नाट संशोधन केले असून आता शेतातील पिकांवर कोणत्या प्रकारचा रोग येणार आहे, हे आता आदेश शेतकरी बंधूंना माहीत होईल अशा प्रकारचे एक उपकरण तयार केले असून त्याला ‘खेती ज्योतिष’ स्टार्टअप असे नाव त्यांनी दिले आहे. हे यंत्र सौर उर्जेवर चालणारे असून यामध्ये सिम कार्ड कनेक्ट करण्यात आले असून इंटरनेटच्या मदतीने शेतकऱ्यांना पिकासंबंधीत अचूक माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
जर शेतीच्या बाबतीत विचार केला तर सगळ्यात जास्त नुकसान हे पिकांवर प्रादुर्भाव होणाऱ्या विविध रोगामुळे आणि किडीमुळे होते.
तसेच कोणत्या रोगावर कोणते औषध केव्हा फवारायचे हे देखील बरेचसे शेतकऱ्यांना आज देखील पुरेसे माहिती नसते त्यामुळे शेतकरी बंधूंचे फार मोठे नुकसान होते.
परंतु जर अगोदरच शेतकरी बंधूंना पिकावर कुठला रोग येणार आहे हे जर शेतकऱ्यांना कळले तर भविष्यात पिकांचे होणारे नुकसान टळू शकणार आहे. विशेष म्हणजे हे यंत्र सौर उर्जेवर बनवण्यात आल्यामुळे या संबंधीच्या कुठलाही डेटा गोळा करताना या उपकरणाला समस्या येणार नाही.
यामध्ये असलेल्या सिम कार्डमुळे शेताचे तापमान तसेच मातीचा ओलावा, वाऱ्याची दिशा तसेच सूर्यप्रकाश व पाऊस इत्यादी हवामान कारकांची माहिती एका ठिकाणी जमा करणे शक्य होणार असून या सगळ्या वातावरणीय बाबींवरून पिकावर कोणता रोग येण्याची शक्यता आहे हे समजू शकणार आहे.
– Agri Startup: Ratnakar Patil