धुळे (#dhule): येथील माता रमाई स्मारक समितीचे (mata ramai smarak samiti dhule) अध्यक्ष, लोकनेते, दलितमिञ वाल्मिक दामोदर (valmik damodar) यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात रमाई आंबेडकर (ramai ambedkar) यांची जयंती मंगळवारी उत्साहात साजरी झाली. धुळ्यातील केशव गार्डनमध्ये आयोजित केलेल्या समारंभात प्रसिध्द दिग्दर्शक नागराज मंजुळे (#nagraj manjule) आणि प्रसिध्द गायिका कडुबाई खरात (#kadubai kharat) यांना माता रमाई कलावैभव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यंदाच्या जयंतीचे मुख्य आकर्षण असलेले नागराज मंजुळे यांना पहाण्यासाठी आणि त्यांचे विचार ऐकण्यासाठी धुळेकरांनी एकच गर्दी केली होती. आपल्या विद्रोही वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असणारे नागराज मंजुळे धुळ्यात माञ काही विशेष बोलले नाहीत. आपल्या इतर चिञपटांप्रमाणे आगामी चिञपटही आवर्जून पहावेत असे आवाहन त्यांनी केले. #ghar banduk biryani ‘घर बंदूक बिर्याणी’च्या प्रमोशनसाठी आपण मार्चमध्ये धुळ्यात येणार असल्याचे ते म्हणाले. इतर अभिनेते आणि दिग्दर्शकांप्रमाणे नागराज मंजुळे यांनी देखील केवळ प्रोफेशनल वक्तव्य केल्याने धुळेकर निराश झाल्याचे चिञ होते. कडुबाई खरात यांच्या भीमगितांनी माञ कार्यक्रमात रंगत आणली. या कार्यक्रमात कर्तबगार महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूञसंचालन जगदिश देवपूरकर (jagdish devpurkar), प्रा. सतिष निकम (prof. satish nikam), पूनम बेडसे (poonam bedse) यांनी केले.