धुळे (Dhule): मुंबई-आग्रा महामार्गावरील सोनगिर टोल प्रशासनाच्या गैरकारभारा विरोधात भीम आर्मी मैदानात उतरली असून, चौकशी करण्याची मागणी केली आहे. #songir toll plaza
धुळे येथे पञकार भवनात झालेल्या पञकार परिषदेत भीम आर्मीचे (#bhim army) जिल्हाध्यक्ष संजय चव्हाण यांनी सांगितले, सोनगीर टोल प्रशासनातील एक मुजोर अधिकारी पोलिसांना दरमहा काही ठरावीक रक्कम गिफ्ट म्हणून देतो. त्यामुळे पोलीस दबावात काम करतात आणि टोल ऑफिस् सांगेल तशी ड्युटी बजावतात. या मुजोर अधिकार्याला राजकीय पाठबळ असल्याची माहिती मिळाली आहे, ते कोणते पुढारी आहेत याचा आम्ही शोध घेत आहोत. अनैतिक कृत्य करणार्या परराज्यातील या अधिकार्याला संपूर्णपणे नियमबाह्य जाऊन सोनगीर टोलचेच २-३ अब्रु विकलेले आपलेच मराठी कर्मचारी आर्थिक लोभापोटी मदत करीत आहेत.
एक स्वयंघोषीत जनरल मॅनेजर आर्थिक गैरव्यवहार करुन धुळे ते पळासनेर हायवेवरील सर्व हॉटेल बांधवांकडून व अतिक्रमण धारकांकडून वसुली करतो. भिम आर्मीकडे तशा तक्रारी आल्या आहेत. सोनगीर टोल प्रशासनातील केलेल्या कार्यवाहीबद्दलचे सर्व पुरावे (वार्निंग लेटर) भीम आर्मीच्या हाती लागले आहेत. या मुजोर अधिकार्यांवर कुठल्याही प्रकारची कारवाई न करता सोनगीर टोल प्रशासनाचे अधिकारी सोबत रात्रंदिवस घेऊन फिरत आहेत. हा परप्रांतीय अधिकारी भाषिक द्वेषभावनेतून काम करीत असल्याची शंका आहे. कारण तो एक-एक करुन स्थानिक मराठी तरुणांना कामावरुन कमी करत आहे.
टोल कलेक्शनमध्ये देखील गैरव्यवहार आहे. वसुली कमी दाखवली जाते. त्यामुळे वर्षानुवर्षे टोल सुरुच राहील. जनतेला आयुष्यभर टोल भरत राहावा लागेल. अशा धनधाकड व मुजोर परराज्यातील अधिकार्यावर व त्यांच्या सहकार्यांवर कार्यवाही करावी, अशी मागणी करीत भीम आर्मी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
पहिले प्रकरण – (शैलेश माळी)
शैलेश राजू माळी वय २५, रा. सोनगीर हा सोनगीर टोल प्रशासनाचा देवपूर येथील गेस्ट हाऊसमध्ये स्वयंपाक सहाय्यक म्हणून मागील १० वर्षांपासून काम करीत होता. शैलेश माळी याने १२/४/२०२२ रोजी अवैधरित्या गेस्टहाऊसमध्ये कोणतीतरी महिला आणली असा आरोप सोनगीर टोल प्रशासनाने लावला आहे. त्याच्यावर कार्यवाही म्हणून त्याच्याकडून टोल प्रशासनाने बळजबरीने राजीनामा लिहून घेतला. परंतु जर प्रत्यक्षात अशी अनैतिक घटना घडली होती तर ती फौजदारी स्वरुपाची असताना देखील टोल प्रशासनाने घटनेवर पांघरुण का घातले? पोलीसांना का कळविले नाही ? उलट त्या गरीब कर्मचार्याकडून राजीनामा लिहून घेतला. आणि सर्व चूक शैलेश माळीची आहे असे सर्वांसमोर चित्र उभे केले. पण प्रत्यक्षात असे होते की, सोनगीर टोल प्रशासनातील काही स्त्रीलंपट अधिकार्यांनीच कोणत्यातरी महिलेला आणण्याचे अनैतिक कृत्य एका ड्रायव्हरच्या सहाय्याने केले होते व ते एका गरीब कष्टकरी कर्मचार्याच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला. भीम आर्मी संघटनेचे शिष्टमंडळ सोनगीर टोल प्रशासनासोबत चर्चा करण्यासाठी गेले व अशा स्त्रीलंपट अधिकार्यांचा पर्दाफाश करण्यात आला. तक्रार करुन देखील सोनगीर पोलीस प्रशासनाकडून हे प्रकरण दडपण्यात आले.
त्यानंतर अजुन एक माहिती समोर आली होती की, सोनगीर टोल प्रशासनातील सर्वात वरिष्ठ अधिकार्याने संबंधीत कर्मचार्याला ६ महिने नोकरीसाठी हेलपाटे मारायला लावल्यानंतर एक दिवशी टोलवर भेट घालून तुला ७ दिवसात कामावर रुजू करुन घेतो असे नोकरीचे अमीष दाखवून त्या गरीब कर्मचार्याकडून त्याच्या परिवारातील एकाशी शरीर सुखाची मागणी घातली होती. अशा या घाणेरड्या कृत्याबद्दल सोनगीर पोलीस प्रशासनाकडे त्या स्त्रीलंपट अधिकार्याची वारंवार तक्रार करण्यासाठी गेलेल्या संबंधीत कर्मचारी व त्याच्या परिवाराला तक्रार न घेता हाकलून लावले. शेवटी भीम आर्मी संघटनेचे सर्व पदाधिकारी सोनगीर पोलीस स्टेशनला गेले असता सर्व घडलेल्या घटनेची चर्चा झाल्यानंतर अखेर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन देऊन परत पाठवले. परंतु अदखलपात्र गुन्हा नोंदवून आपले कर्तव्य पार पाडले.
दुसरे प्रकरण – (प्रसाद मोरे)
सोनगीर टोल प्रशासनाने सोनगीर पोलीस प्रशासनाला हाताशी धरुन त्यांचे अनैतिक कृत्य चालूच ठेवले. प्रसाद शरद मोरे वय ३२ वर्ष रा. धुळे हा मागील १० वर्षांपासून सोनगीर टोल येथे मेल नर्स म्हणून कामाला होता. परंतु जून २०२२ या दरम्यान फक्त टी शर्ट घातल्या कारणाने अचानक सोनगीर टोल प्रशासनाने काही सबळ कारण नसतांना व नियमाप्रमाणे कोणतीही पूर्वसुचना न देता कामावरुन काढून टाकले. कामावरुन काढून टाकण्याची माहिती त्यांनी मोबाईलवर पाठविली, जी नियमबाह्य आहे. संबंधीत कर्मचार्याने त्याची चुक झाली असेल म्हणून जून व ऑगस्ट २०२२ या दरम्यान २ वेळा त्याच्या वडिलांना सोबत घेऊन टोल प्रशासनाला भेटण्यासाठी गेला असता त्यांनी दोन्ही वेळेस त्याचा व त्याच्या वडिलांसोबत अरेरावीची भाषा वापरुन व जातीवाचक शिवीगाळ करून अवमान केला व तेथुन हाकलून लावले. त्यानंतर संबंधीत कर्मचार्याने त्या मुजोर अधिकार्यांविरुध्द तक्रार करण्यासाठी सोनगीर पोलीस स्टेशन गाठले. सोनगीर पोलीसांनी त्याचे काहीही ऐकून घेतले नाही. उलट संबंधीत कर्मचार्यावर खोट्या स्वरुपाची तक्रार दाखल करुन पोलीस प्रशासनाची व टोल प्रशासनाची आर्थिक मैत्री सिध्द केली. संबंधीत कर्मचार्याने भीम आर्मीकडे मदत मागितली. काही दिवसानंतर भीम आर्मीचे शिष्टमंडळ प्रसाद मोरे व शैलेश माळी या दोघांना सोबत घेऊन सोनगीर टोल प्रशासनाला भेटण्यासाठी गेले असता त्यांच्यासोबत चर्चा सुरु असताना टोल प्रशासनाने काहीही कारण नसतांना सोनगीर पोलीसांना बोलावून घेतले. व त्यांच्यामार्फत आम्हाला घाबरविण्याचा प्रयत्न केला. चर्चा सुरळीत चालू असतांना अचानकपणे टोल प्रशासनाने अरेरावीची भाषा वापरण्यास सुरुवात केली तेही पोलीसांसमोरच. शेवटी टोल अधिकार्याने २-३ दिवसांत संबंधीत कर्मचार्यांना कामावर घेण्यासंबंधीचा निर्णय घेऊन कळवितो असे आश्वासन देत आम्हाला जाण्यास सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी सोनगीर पोलीस प्रशासनाला हाताशी घेऊन भीम मआर्मीच्या शिष्टमंडळावर टोल प्रशासनाने साम-दाम-दंड भेद व आर्थिक आमिष, राजकीय दडपण आणले आणि पोलिसांकरवी फिर्याद दाखल करुन भीमआर्मी संघटनेला घाबरविण्याचा प्रयत्न केला.
26 जानेवारी २०२३ रोजी प्रसाद शरद मोरे याने सोनगीर टोलच्या जाचाला कंटाळून व पोलीस प्रशासनात कुठल्याही प्रकारची कारवाई न झाल्यामुळे हताश होऊन जिल्हाधिकारी कार्यालय येथे विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. धुळे शहर पोलीस प्रशासनाने तत्परता दाखवत संबंधीताचा जीव वाचविला. त्यावेळी तेथे पालकमंत्र्यांनी याची तात्काळ दखल घेऊन कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. जिल्हाधिकार्यांनी हे प्रकरण कर्तव्यदक्ष प्रांत अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडे वर्ग केले. त्यांनी सर्व बाबी तपासून आपल्या प्रकरणाची तपासाची गती तीव्र केली आहे.
तिसरे प्रकरण – (खेड शिवापूर टोल, पुणे)
दरम्यान, भीम आर्मी संघटना संबंधीत टोल अधिकार्यांच्या सर्व प्रकरणांमध्ये खोलात गेली असता अजुन काही गंभीर प्रकरण हाती लागले. सोनगीर टोल प्रशायनामध्ये एक वरीष्ठ व जबाबदार अधिकारी ३-४ वर्षांपूर्वी खेड शिवापूर टोल पुणे येथे कार्यरत असतांना एका पोलीस अधिकार्याच्या कुटूंबासोबत वाद झाला होता. या वादात टोल अधिकार्याने पोलीस अधिकार्याच्या कुटूंबासोबत अरेरावी भाषा वापरुन व आपल्या पदाचा दुरुपयोग करुन त्रास दिला होता. या प्रकरणामध्ये एक रात्र राजगड पोलीस स्टेशन पुणे येथे पोलीसांच्या ताब्यात होता. त्या टोल अधिकार्यायाला संबंधीत पोलीसांनी चांगले धुतले होते. अशी माहिती स्वत: त्या संबंधीत पोलीस अधिकार्याने भीम आर्मी पुणे टिमला दिली आहे. याची ऑडीओ रेकॉर्डींग सुध्दा पुराव्यासाठी भीमआर्मीकडे उपलब्ध आहे.
चौथे प्रकरण – (पीडित महीला)
याच मुजोर टोल अधिकार्याचे अजुन एक गंभीर प्रकरण भीम आर्मीच्या हाती लागले ते म्हणजे जुलै २०२१ या दरम्यान पांझरा नदी किनारी एका दर्गाजवळ याच टोल अधिकार्याने एका महिलेला हात लावून लज्जा वाटेल असे संभाषण करुन छेड काढली होती. म्हणून त्यावेळी चौकात असलेल्या जमावाने त्याला चांगलाच चोप दिलि होता. तो व्हीडिओ भीम आर्मीच्या हाती लागला आहे. पीडित महिलेने पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद देण्याचा प्रयत्न केला असता काही राजकीय प्रतिधींच्या हस्तक्षेपात गुन्हा नोंदविला गेला. शिवाय पीडित महिलेला टोल अधिकार्याने व त्याच्या गुंडांनी धमकावून तेथुन हाकलून लावले.
भीम आर्मी शैलेश माळी व प्रसाद मोरे यांचे प्रकरण हाताळत असतांना बातम्या प्रसिध्दीमुळे पीडित महिलेने युट्युबवर बघून भीम आर्मी सोबत संपर्क साधला. पीडित महिला पुन्हा त्या अधिकार्याविरुध्द शहर पोलीस स्टेशन धुळे येथे गुन्हा नोंद करण्यासाठी आली. पोलीस अधिकार्यांनी गुन्हाची नोंद केली नाही. उलट असे सांगितले की, ही घटना फार जुनी आहे. घटनेच्या जागेवर सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते. म्हणून घटना घडली की नाही हे सांगता येत नाही. असे बोलून पीडित महिलेस दुसर्यांदा परतावून लावले. त्या महिलेने लगेच कार्यकारी दंडाधिकारी समक्ष आपल्या जबाबाचे प्रतिज्ञापत्र नोंदविले व प्रसारमाध्यमांना आपल्या सोबत घडलेल्या कृत्याची माहिती दिली.
एवढे संपूर्ण गंभीर प्रकारचे कृत्य त्या टोल प्रशासनाच्या अधिकार्याविरुध्द सर्व पुरावे असतांना व पोलीस प्रशासनाला वेळोवेळी तक्रारी देऊन सुध्दा आजपावेतो कुठल्याही स्वरुपाची कार्यवाही झालेली नाही.
या प्रकरणांची चौकशी करुन गुन्हे दाखल करावे, कर्मचार्यांना पुन्हा कामावर घ्यावे, अशी मागणी
संजय चव्हाण (रावण), संजय अहिरे, भैय्या वाघ, उत्तम झनके यांनी केली आहे.