#pradhanmantri jan arogya yojana धुळे : महाराष्ट्रातील गरजू व तळागाळातील लोकांना दर्जेदार व मोफत उपचार उपलब्ध करून त्यांचे आरोग्यमान उंचविण्याच्या दृष्टीने साकारलेली आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व राज्य शासनाची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या एकत्रित स्वरूपात गेल्या ४ वर्षांपासून राबविण्यात येत आहेत.
प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतंर्गत १२०९ उपचारांकरिता प्रति वर्ष, प्रति कुटुंब रु. ५ लाखापर्यंतचे वैद्यकीय संरक्षण उपलब्ध आहे. नागरीकांना या योजनेमध्ये उपचारपूर्व तपासण्या, वैद्यकीय उपचार, प्रत्यारोपण साहित्य, शस्त्रक्रिया, रुग्णालयातील वास्तव्य, जेवण हे निःशुल्क उपलब्ध आहेत. उपचारानंतर परतीचा प्रवास खर्च योजनेअंतर्गत दिला जातो.
या योजनेसाठी २०११ च्या जनगणनेनुसार SECC डाटा नुसार (सामाजिक, आर्थिक व जातीय जनगणनेनुसार) यादीमधील लाभार्थीनी आपल्या गावातील अथवा जवळील CSCS केंद्र (सामुदायिक सेवा केंद्र) ला आपले आधार कार्ड व रेशन कार्ड घेऊन मोफत आयुष्यमान कार्ड बनवून घ्यावे. असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.
#ayushman bharat card आयुष्यमान भारत कार्ड CSCS केंद्र, संग्राम केंद्र, आपले सेवा सरकार केंद्र आणि योजनेअंतर्गत अंगीकृत असलेले सर्व रुग्णालयात पूर्णपणे मोफत व नि:शुल्क वाटप होत आहे. कोणत्याही व्यक्तीकडून या संबंधित काही शुल्क आकारण्यात आल्यास पुढील दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. टोल फ्री क्रमांक १४५५५/१८००१११५६५.