#Dhule धुळे : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (balasaheb thorat) यांच्या नाराजीबाबत विचारले असता, आमदार सत्यजित तांबे (mla satyajit tambe) म्हणाले, मी अपक्ष आमदार असून, थोरात यांच्याबाबत यापूर्वीच भूमिका मांडलेली आहे. त्यामुळे आता बोलणार नाही असे सांगत त्यांनी राजकीय प्रश्नांना बगल दिली.
शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रश्न सुटले असले तरी अजूनही काही प्रश्न प्रलंबितच आहेत. यावर मार्ग काढण्यासाठी येत्या एप्रिल-मे महिन्यांत शिक्षण परिषद घेऊन महाराष्ट्राचा पुढील २५ वर्षाचा रोडमॅप तयार करून तो शासनाला सादर केला जाईल. तसेच येत्या अधिवेशनात मतदारसंघाचे प्रश्न मांडणार असल्याचे पदवीधर मतदार संघाचे (padavidhar matdar sangh) नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले. विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर आमदार सत्यजित तांबे प्रथमच धुळ्यात आले होते. यावेळी पत्रकार भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. वडील डॉ. सुधीर तांबे (Dr. sudhir tambe) यांनी मतदारसंघात गेल्या अनेक वर्षात केलेल्या कामामुळे आपल्याला निवडणुकीत चांगला प्रतिसाद मिळाला असे सांगून सत्यजित तांबे म्हणाले, आता माझ्यावर फार मोठी जबाबदारी आलेली आहे. पदवीधरांचे विविध प्रश्न सरकार दरबारी मांडण्याचे आपले प्राधान्य असेल. काही वर्षापासून शिक्षकांची भरती, जुनी पेन्शन योजना यांसारखे अनेक प्रशन प्रलंबित आहे. याबाबत शिक्षण मंञ्यांशी चर्चा केली जाईल, शिक्षण विभागातील प्रशन हे अर्थ विभागामुळे प्रलंबित आहेत. त्यामुळे अर्थमंञ्यांशी या संदर्भात चर्चा केली जाईल. समृद्धी महामार्गासह (samruddhi mahamarg) नव्याने होणाऱ्या चेनई- सुरत महामार्गामुळे नाशिकच्या ‘विकासाला संधी आहे. या पायाभूत सुविधा धुळे-नंदुरबारपर्यंत पोहोचविण्याचा आपला प्रयत्न असेल.
व्हिडिओ क्वालिटी फारच अप्रतीम असते