#Dule Rasta Roko धुळे: पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यासाठी मुंबई-आग्रा महामार्गाच्या (NH3) दुतर्फा गटारी कराव्यात, अपघात टाळण्यासाठी चाळीसगाव चौफुली येथे उड्डाणपूल उभारावा या मागणीसाठी धुळे शहरात चाळीसगाव चौफुलीवर शनिवारी सकाळी एआयएमआयएम (AIMIM) पक्षाने रास्तारोको आंदोलन केले. आमदार फारुख शाह (mla farukh shah) यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनामुळे महामार्गाची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. आमदारांसह आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. नंतर त्यांची सुटका करण्यात आली. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) तसेच सोनगीर व अवधान टोल नाका यांच्या दुर्लक्षपणामुळे पावसाळ्यात पावसाळ्यात महामार्गाचे पाणी शहरात शिरून नागरीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्याच्यासाठी NHAI व अवधान व सोनगीर टोल नाक्यावाल्यांनी तत्काळ पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारी करण्याची मागणी आहे. तसेच चाळीसगाव चौफुली येथे उड्डाणपूल नसल्यामुळे अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला. आमदार फारुख शाह यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी पत्रव्यवहार करून उड्डाणपूल मंजुर करून घेतला आहे. परंतु आजपर्यंत त्याचे काम सुरु झालेले नाही. तसेच महाराष्ट्राच्या सीमेपासून ते नाशिकपर्यंत महामार्गाची व्यवस्था खराब झालेली आहे. त्यामुळे टोल नाक्यावाल्याना टोल घेण्याचा अधिकार नाही. या मागण्यांसाठी हे आंदोलन झाले. आंदोलनात सलीम शाह, भिखन हाजी शाह, जिल्हाध्यक्ष नासिर पठाण, शहराध्यक्ष मुक्तार अन्सारी, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा डॉ. दीपश्री नाईक, नगरसेवक सईद बेग, नगरसेवक गनी डॉलर, नगरसेवक आमिर पठाण, माजी नगरसेवक साबीर सैय्यद, माजी नगरसेवक साजिद साई, रफिक पठाण, प्यारेलाल पिंजारी, इकबाल शाह, शोएब मुल्ला, निजाम सैय्यद, आसिफ शाह मुल्ला, नुरा ठेकेदार, आसिफ शाह, परवेज शाह, निसार अन्सारी, हालीम शमसुद्दीन, वसिम अक्रम, कैसर अहमद, फातेमा अन्सारी, शाहेदा अन्सारी, महेमुदा अन्सारी, अकीला सैय्यद, रिझवान मणियार, जुबेदा शेख, हमिदा पठाण, सलीम शाह, सत्तार शाह, फकृद्दिन लोहार, शहेबाज शाह, शेख, माजिद पठाण, सउद आलम, सउद सरदार, अझर सय्यद, अकीब अली, जुबेर शाह, नझर पठाण, ईबा ठेकेदार, समीर मिर्झा, जीलानी खाटीक, निजाम तिरंगा, वसिम पिंजारी, रिझवान अन्सारी, साकिब शाह, बादल शाह आदींसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.