#dhule धुळेः बांधकाम विभागातील रेकॉर्ड तात्काळ ताब्यात घ्या. अन्यथा पुन्हा एकदा जळीत कांड (dhule mahapalika jalit kand) होण्याची दाट शक्यता असल्याची भिती शिवसेनाने व्यक्त केली आहे.
#शासन, प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 12 जानेवारी रोजी धुळे शहरात चक्करबर्डी जलकुंभाची संरक्षण भिंत पडल्या प्रकरणी निकृष्ट काम झाल्याची तक्रार शिवसेनाने केली. याबाबत आपल्या स्तरावरून तात्काळ खातरजमा का करण्यात आली नाही. जेणेकरून संबंधीत कामाचे कार्यादेश, मोजमाप पुस्तिका, अंदाजपत्रक, प्रत्यक्ष कामावर देखरेख ठेवणार्या अभियंत्याचे हालचाल रजिस्टर तसेच त्यांची रोजनिशी, प्रगती अहवालाचे दस्तावेजाची आपल्या स्तरावर मागणी करून संबंधीताकडून सदर कागदपत्र आपल्या ताब्यात घेण्यात यावे. असे झाले नाही तर कदाचित सदर रेकॉर्ड गायब होण्याची शक्यता आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
#मातीचे बांधकाम देखील चांगल्या दर्जाचे व बरेच वर्ष टिकते. मग स्टील, कॉंक्रीट, सिमेंटची भिंत 20 दिवसात कशी पडली, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
#याबाबत याआधीच तक्रार दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल आणि तांञिक चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी करणारे स्मरणपञ शिवसेनेचे उपमहानगरप्रमुख प्रविण साळवे (pravin salve) यांनी आयुक्तांना दिले आहे.