#dhule crime धुळे : तालुक्यातील बोरकुंड#रतनपुरा शिवारात शेतजमिनीचे सपाटीकरण करणार्या कंञाटदाराचा खून (murder) झाला आहे.
शेतीकामाच्या लेव्हलिंगसाठी सांगली (#sangli) आणि साताऱ्याहून (#satara) काम करणारे कॉन्ट्रॅक्टर हे दरवर्षी धुळ्यात येत असतात. बोरकुंड भागातील रतनपुरा शिवारात एका शेतात सांगली, साताऱ्याहून आलेल्या दोन तरुण कॉन्ट्रॅक्टरकडून लेव्हलिंगचे काम करण्यात येत होते. दरम्यान, कॉन्ट्रॅक्टरचा ट्रॅक्टर चालकानेच डोक्यात टॅमी घालून खून केल्याची घटना घडली. ही घटना रविवार घडली आणि सोमवारी सकाळी उघडकीस आली. घटनेनंतर ट्रॅक्टर (tractor) चालक पसार झाला आहे.
सातारा, सांगली जिल्ह्यातील शेती सपाटीकरणाचा व्यवसाय करणारे दोन जण धुळे तालुक्यातील बोरकुंड भागातील रतनपुरा येथे कामासाठी आले होते. त्यातील एकाचा बोरकुंडमधील शेतात ट्रॅक्टरजवळ मृतदेह आढळून आला. शेतातून येणाऱ्या जाणाऱ्यांना रविवारी संध्याकाळी हा प्रकार दिसला. पण तो झोपलेला असेल असे अनेकांना वाटले. पण सकाळी शंका आली आणि जवळ गेल्यानंतर त्याचा खून झाल्याचे लक्षात आले.
या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीसांनी धाव घेतली. यावेळी घटनास्थळी मिळालेल्या आधारकार्डच्या आधारे मृत व्यक्तीचे नाव आदर्श दत्तात्रय पिसाळ (वय २३ रा. शेरेशिंदेवाडी जि. सातारा) असे आहे. आदर्श पिसाळ याच्या कपळाजवळ मार लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. ठसे तज्ज्ञांना देखील पाचरण करण्यात आले होते. हा खून का केला? याचे कारण अजून स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.