#Dhule धुळेः येथील प्रसिद्ध गायक, संशोधक, विधी अभ्यासक प्रा. पंडित घन:श्याम थोरात यांना किंग आॅफ टोंगा देशातील काॅमनवेल्थ युनिव्हर्सिटीने मानद डाॅक्टरेट पदवी बहाल केली.
प्रा. थोरात हे गेल्या दोन तपाहून अधिक काळ मानवी हक्क, ट्रॅफिक सेंस, सामजिक न्यायमूल्य यावर प्रबोधन करीत आहेत. या कार्याची दखल घेउन आंतरराष्ट्रीय विद्यापीठाची मानद डॉक्टरेट पीएचडी (रेगुलर नव्हे) त्यांना घोषित झाली.
दरम्यान, आदिवासी आयोगाचे अध्यक्ष तथा ठाणे जिल्हा न्यायाधीश भीमराव डी. नेरकर यांच्या हस्ते ही पदवी त्यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली.
यावेळी शिव व्याख्याते सुकलाल बोरसे, जयहिंद कॉलेजचे प्राचार्य
शिवाजी बैसाणे, सामाजिक कार्यकर्ता लोटन वाघ, सुंदर भोई उपस्थित होते.
https://youtube.com/@no.1maharashtra