#Dhule धुळेः प्रादेशिक पर्यटन विकास योजनेच्या तीन कोटी रुपयांच्या निधीतून वाविध कामे करुन धुळे शहरातील आदिशक्ती एकविरा देवी मंदिराचा (ekvira devi mandir dhule) विकास होणार आहे. आमदार फारुख शाह यांच्या हस्ते सोमवारी कामांचा शुभारंभ करण्यात आला.
#धुळे शहरातील ‘ऐतिहासिक पुरातन एकविरा देवी मंदिरासाठी पर्यटन विभाग शासननिर्णय दि. २३-०२-२२ नुसार ३ कोटी रुपये मंजुर करण्यात आले होते. यात प्रामुख्याने सभामंडप दुरुस्ती, भक्त निवास दुरुस्ती व मंदीर परिसरातील इतर अनुषंगिक कामांचा समावेश आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सविस्तर प्रस्ताव तयार करण्यात आला होता. मात्र राज्यात सत्ताबद्दल झाल्यानंतर पालकमंञ्यांची नियुक्ती लांबल्याने विकासकामांना स्थगाती दिली होती. त्यामुळे एकविरा देवी मंदीर विकासकामे देखील रखडली होती.
#आदिशक्ती एकविरा देवी खान्देश वासियांचे कुलदैवत असल्याने मंदीर परिसराचा विकास होणे आवश्यक आहे हि बाब लक्षात घेवून आमदार फारुख शाह (mla farukh shah) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांची भेट घेऊन स्थगिती उठविणेची मागणी केली. त्यानुसार पर्यटन विभागाने 16 डिसेंबर 2022 रोजी स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित करून एकविरा देवी मंदीर परिसरातील विकास कामांबद्दल स्थगिती उठविली आहे. पर्यटन मंत्री ना. मंगलप्रभात लोढा (manglprabha lodha, minister) यांनी एकविरा देवी मंदीर परिसरातील विकास कामांची स्थगिती उठविली त्याबद्दल मुख्यमंत्री व पर्यटन मंत्री यांचे आमदारांनी आभार मानले आहेत.
#विकासकामांच्या शुभारंभ प्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर.आर.पाटील (r. r. patil), उपअभियंता धर्मेंद्र झालटे (dharmendra zalte), नासिर पठाण, गनी डॉलर, दीपश्री नाईक, मंगला मोरे, आसिफ शाह, रफिक शाह, साबीर सैय्यद, धनराज विभांडीक, अर्जुन बडगुजर ,अड.निलेश पाठक, प्रदीप गुरुजी, चतुर देवरे, दौलत पवार, अमृत कुवर, राजेश चत्रे, बादल जुगलकर, राजु चौधरी, साकीब शाह, विक्रम फुलपगारे, महेंद्र फुलपगारे, निसार अन्सारी, विश्वनाथ ढोले, पंकज गिरासे, विठ्ठल वाघ, जगन माळी, बापू खालाने, चंद्रकांत जाधव, गजानन सोनार, बाबाजी पाटील, पौर्णिमा चौधरी, शारदा पाटील, लीलाबाई सैंदाणे, प्रीती भावसार, रेखा चौधरी, सुलभा चौधरी, रेखा गायकवाड, ज्योती भावसार आदी उपस्थित होते.