शरद पवारांचा मुळचा काळवंडलेला चेहरा आता डांबरासारखा काळा झाला, आमदार गोपिचंद पडळकरांची जीभ घसरली
gopichand padalkar on sharad pawar धुळे (#Dhule): राज्यातील धनगर, कोळी अशा 33 जमातींना एकञ आणून आरक्षण आणि जात वैधता प्रमाणपञासाठी निर्णायक लढा उभारण्याचा निर्धार धनगर समाजाचे नेते आमदार गोपिचंद पडळकर यांनी बुधवारी धुळ्यात केला.
#वर्षानुवर्षे वंचित असलेल्या 33 जमातींना न्याय देणार नसाल तर आदिवासी लोकसंख्येतून उर्वरीत जमातींची संख्या वगळावी आणि त्या संख्येच्या आधारावरच आरक्षण द्यावे अशी टोकाची मागणी आपण शासनाकडे केली आहे. मुख्यमंञी एकनाथ शिंदे (cm #eknath shinde) आणि उपमुख्यमंञी देवेंद्र फडणविस (dcm #devendra fadnvis) यांच्या नेतृत्वाखाली चांगले सरकार आले असून, या सरकारच्या माध्यमातून आपण आरक्षणाचा प्रश्न मार्गी लाऊ, असे आश्वासनही आमदार पडळकर यांनी दिले. कोळी जमातीच्या विविध मागण्यांसाठी निघालेल्या महाआक्रोश मोर्चात ते सहभागी झाले होते.
#राष्ट्रवादी काॅंग्रेसचे (#ncp) नेते शरद पवार (sharad pawar) यांनी काही आदिवासी पुढार्यांना हाताशी धरुन या 33 जमातींवर अन्याय करण्याचे राजकारण केल्याने मोठे नुकसान झाल्याची टिका त्यांनी केली. तसेच पहाटे शपथविधीच्या राजकारणावर उपमुख्यमंञी देवेंद्र फडणविस यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या गौप्यस्फोटावर बोलताना गोपिचंद पडळकरांची जीभ चांगलीच घसरली.
#आदिवासी कोळीढोर, महादेव कोळी, टोकरे कोळी, मल्हारकोळी या जमातींना सुलभतेने विनाअट अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपञ, जात वैधता प्रमाणपञ देऊन या जमातींवर सन 1950 पासून सातत्याने होत असलेला अन्याय दूर करावा या मागणीसाठी कोळी समाजाने धुळे शहरात बुधवारी भव्य महाआक्रोश मोर्चा काढला. या मोर्चात आमदार गोपिचंद पडळकर सहभागी झाले. आदिवासी कोळी जमात सामाजिक संस्था आणि वीरांगणा झलकारीबाई कोळी स्ञी शक्ती सामाजिक संस्थेने काढलेल्या या मोर्चाचे नेतृत्व कोळी जमातीच्या नेत्या गितांजली कोळी यांनी केले. मोर्चानंतर क्युमाईन क्लबजवळ जाहिर सभा झाली. मोर्चेकर्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले. त्यात विविध 15 मागण्या केल्या आहेत. या मोर्चात प्रा. खानापूरे, अॅड. गणेश सोनवणे, एम. डी. कोळी यांच्यासह उत्तर महाराष्ट्रातील शेकडो समाजबांधव, महिला सहभागी झाल्या होत्या.