despite-the-majority-in-zp-bjp-is-ashamed-of-defeat-will-action-be-taken-against-those-two-members-of-bjp?
#Dhule धुळेः येथील जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीचे बहूमत असताना देखील त्यांच्या दोन सदस्यांनी गद्दारी केल्याने स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचा उमेदवार निवडून आला. या दोन सदस्यांवर पक्षाने कारवाई करावी, अशी मागणी पराभव झालेले उमेदवार संग्राम पाटील यांनी केली आहे. त्यामुळे भाजपच्या त्या फुटलेल्या दोन सदस्यांवर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजपचे बहुमत असतानाही त्यांच्या उमेदवाराचा पराभव झाल्याची नामुष्की पक्षावर ओढावली. विजयानंतर महाविकास आघाडीच्या सदस्यांनी फटाके फोडत जल्लोष केला. दरम्यान उर्वरित सहा समितीच्या ११ सदस्यांची बिनविरोध निवड झाली.
#बिनविरोध झालेले सदस्य असे
कृषी समितीः मोगरा जयवंत पाडवी, कुसुमबाई निकम, शांताराम पोसल्या कुंवर, वंदना भारत ईशी.
समाजकल्याण समितीः वंदना रतन मोरे.
बांधकाम समितीः मंगला सुरेश पाटील.
वित्त समितीः संग्राम गोविद पाटील, धरती निखिल देवरे
आरोग्य समितीः लताबाई वसंत पावरा, धरती देवरे,
महिला व बालकल्याण समितीः मोगरा जयवंत पाडवी.
जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सदस्यपदाच्या तीन जागांसाठी बुधवारी मतदान झाले. विशेष म्हणजे बिनविरोध निवडीची ऐतिहासिक परंपरा यावेळी खंडित झाली. या निवडणुकीत भाजपची दोन मते फुटली. स्थायी समिती सदस्यपदी माजी अध्यक्ष तुषार विश्वासराव रंधे, कुसुमबाई कामराज निकम तर महाविकास आघाडीचे किरण गुलाबराव पाटील यांची निवड झाली. या निवडणुकीत भाजपचे संग्राम गोविंदा पाटील यांचा पराभव झाला.
#१८ नोव्हेंबर २२ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत विषय समिती सदस्य निवडीचा विषय अजेंड्यावर होता. मात्र ऐनवेळी हा विषय तहकूब केला होता. विषय समिती सदस्यांची निवड करण्यासाठी जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा अध्यक्षा
अश्विनी पवार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झाली. कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या सभेस व्यासपीठावर उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, महिला बालकल्याण सभापती संजीवनी सिसोदे, समाजकल्याण सभापती कैलास पावरा, कृषी सभापती हर्षवर्धन दहिते, शिक्षण सभापती महावीरसिंग रावल, मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस., अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकात पवार उपस्थित होते.
सहा समितीच्या ११ सदस्यांची निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर केले. मात्र, स्थायी समितीच्या तीन जागांसाठी सहा उमेदवारांचे नऊ अर्ज असल्याने, पेच निर्माण झाला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी माघारीसाठी १५ मिनिटांची मुदत दिली होती.
सभा सुरू झाल्यानंतर उपाध्यक्ष देवेंद्र पाटील यांनी विरोधी सदस्यांना स्थायीची निवड बिनविरोध करण्याची विनंती केली. त्यानुसार महाविकास आघाडीच्या सीता शानाभाऊ सोनवणे व मोतनबाई रावण पाटील यांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे तीन जागांसाठी चार उमेदवार रिंगणात होते. महाविकास आघाडीच्या दोन उमेदवारांनी माघार घेतल्याने, किरण गुलाबराव पाटील यांनीही उमेदवारी अर्ज माघारी घेऊन निवडणूक बिनविरोध करावी यासाठी उपाध्यक्ष देवेंद्र पाटील व्यासपीठावरून खाली उरले किरण पाटील यांच्याकडे गेले. त्यानंतर त्यांनी किरण पाटील यांना चर्चेसाठी एका खोलीत नेले. त्यांच्यासोबत तुषार रंधेही गेले. बंद खोलीत पाच मिनिटे चर्चा झाली. मात्र त्यातून मार्ग निघाला नाही. किरण पाटील यांनी उमेदवारी अर्ज
मागे न घेतल्याने, अखेर स्थायी समितीसाठी मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला. गुप्त पद्धतीने मतदान झाले. मतदानासाठी १४ चा कोटा निश्चित करण्यात आला होता. पहिल्या फेरीत तुषार रंधे त किरण पाटील यांना १४-१४ मते मिळाल्याने त्यांची निवड झाली. तर कुसुम निकम, संग्राम पाटील यांनाही पहिल्या पसंतीची ८-८ समान मते मिळाली.
त्यानंतर दुसऱ्या पसंतीची मते कोणाची द्यायची, याची चिठ्ठी काढण्यात आली. ती मते कोणाला द्यायची, याचीही चिठ्ठी काढण्यात आली. त्यात तुषार रंधे यांची मते कुसुम निकम यांना मिळाल्याने तिसऱ्या जागेवर निकम यांची निवड झाल्याचे जाहीर केले. तर संग्राम पाटील यांचा पराभव झाला.