jee-neet-mht-cet-trainees-free-tab-and-data-sim-card
धुळे (#Dhule) : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) महाराष्ट्र राज्य, नागपूर या संस्थेमार्फत जेईई, एनईईटी, एमएचटी-सीईटीचे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट व डाटा सीम कार्ड देण्याची योजना राबविण्यात येत असून अशा विद्यार्थ्यांना मंजूर झालेले टॅबलेट व इतर साहित्य घेवून जाण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांनी केले आहे.
महाज्योती, नागपूर संस्थेमार्फत निवड झालेल्या धुळे जिल्ह्यातील 398 व नंदुरबार जिल्ह्यातील 42 विद्यार्थ्यांसाठी टॅबलेट, डाटा सीम कार्ड, हेडफोन, कॅरीकेस व कॅरीबॅग इ. साहित्याचा पुरवठा करण्यात आला असून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 13 फेब्रुवारी रोजी समाज कल्याण कार्यालयातील मुकेश कानडे, कार्यालय अधिक्षक, आर. एम. काळे, कनिष्ठ लिपीक, पी. एच. जाधव, कनिष्ठ लिपीक यांच्या उपस्थितीत वितरीत करण्यात आले आहे.
जे विद्यार्थी 13 फेब्रुवारी रोजी अनुपस्थित होते अशा विद्यार्थ्यांनी दोन दिवसाच्या आत टॅबलेट, डाटा सीम कार्ड, हेडफोन, कॅरीकेस व कॅरीबॅग इत्यादी साहित्य सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सिंचन भवनच्या मागे, साक्री रोड, धुळे येथे कार्यालयीन वेळेत येवून घेवून जावे असे आवाहन सहाय्यक आयुक्त श्पाटील यांनी केले आहे.