#Nanand Bhavjayi, who was going to Madhya Pradesh to buy Rudraksh, died in a terrible accident
धुळे (#Dhule): अंधश्रध्देपोटी रुद्राक्ष घेण्यासाठी सिहोरला होणारी भाविकांची गर्दी जीवघेणी ठरली आहे. सिहोरची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. अन्न-पाण्यावाचून हाल होत आहेत. गाड्या अडकून पडल्या आहेत. अपघातामध्ये शिंदखेड्याच्या दोन महिलांचा बळी गेला आहे तर तिकडे देखील काही दूर्घटना घडल्याचे वृत्त आहे. चेंगराचेंगरीत किती जणांचा बळी गेला?, किती बेपत्ता आहेत?, काहीच कळायला मार्ग नाही.
मध्यप्रदेशातील (#MP) सिहोर (#sihor) येथे रुद्राक्ष घेण्यासाठी जीवघेणी गर्दी उसळली आहे. गुरुवारी दुपारपासून सिहोरहून खऱ्या-खोट्या बातम्या वॉट्सअप वर येत आहेत. लाखो भाविक ‘ सिहोर ‘ला गेल्याचे कळतेय. पंडित प्रदीप मिश्रा महाराज यांच्या प्रवचन मंडपापासून सात ते आठ किलोमीटर लांब भाविकांची भयंकर गर्दी असून रुद्राक्ष वितरण सोहळ्यात दोन दिवसांपासून भाविक ताटकळले आहेत. त्यांची खाण्या-पिण्याची व्यवस्था, सुरक्षेची हमी मंदिर प्रशासनाने घेतलेली नाही. शिवाय एक ‘रुद्राक्ष ‘मिळवण्यासाठी भाविकांच्या चेंगरा-चेंगरीत शेकडो भाविक जखमी झाल्याचे समजते.
प्रत्येकाला आयष्यात जीवन जगतांना दुःख, शारीरिक व्याधी, संकटे हमखास येणारच. त्यांना सामोरे जाण्यासाठी हिम्मत, समजदारी व संयम दाखवतो तोच त्यांच्यावर मात करू शकतो. संकटे, दुःख येतात तशी जातात सुद्धा. एका ‘रुद्राक्ष ‘ ने आपल्या जीवनातील दुःख, संकटे, शारीरिक आजार नाहीसे होतील व आपण सुखात, आनंदात, रोगमुक्त होऊ असे कदापी शक्य नाही. ही निव्वळ अंधश्रद्धा आहे.
#रूद्राक्ष घेण्यासाठी मध्यप्रदेश येथे जाणाऱ्या नणंद भावजयीचा भीषण अपघातात मृत्यू
धुळेः रूद्राक्ष घेण्यासाठी मध्यप्रदेशातील सिहोर येथे जाणाऱ्या शिंदखेडा येथील नणंद भावजयीचा दुर्दैवी भीषण अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मध्यप्रदेशातील देवास बायपास रस्त्यावर घडली. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण शिंदखेड्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मध्य प्रदेशातील सिहोर येथे पंडीत प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेसाठी धुळे जिल्ह्यातून असंख्य भाविक जात आहेत. त्यातच शिंदखेडा शहरातील माळीवाड्यातील जनता नगर भागातील महिला पंडीत प्रदीप मिश्रा यांच्या कथेत सहभागी होण्यासाठी जायला निघाल्या होत्या. प्रवासादरम्यान त्या जेवणासाठी देवास बायपास रोडलगतच्या उपहारगृहात थांबल्या होत्या जेवण झाल्यानंतर रस्ता ओलांडत असतांना भरधाव वेगातील स्कॉर्पिओ वाहनाने जोरदार धडक दिली. यात मंगलाबाई अभिमन जाधव (४४) या गंभीर जखमी झाल्या. तर त्यांची नणंद सुनंदाबाई रवींद्र मिस्तरी (४५) या जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
हा अपघात रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडला. या धडकेत सुनंदाबाई या जागीच ठार झाल्या. तर मंगलाबाई गंभीर जखमी झाल्याने, त्यांना तत्काळ शिरपूर येथील कॉटेज रूग्णालयाात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. एकाच परिवारातील दोघ महिलांचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. काल शोकाकूल वातावरणात शिंदखेडा दोघींवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. सुनंदाबाई मिस्तरी यांच्या पश्चात पती, सासू, दोन मुले, दोन मुली असा परिवार अहे. तर मंगलाबाई यांच्या पश्चात पती, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे.