#Dhule धुळेः वडजाई रस्त्यापासून सुमारे एक ते दीड कालोमीटर अंतरावर असलेल्या हजरत मुरुद्दीन गाझी रहेमतुल्लाह दर्ग्यासाठी रस्ता तयार होत असून, पथदिवेही लागणार आहेत. तसेच दर्ग्याला संरक्षक भिंत बांधली जाणार आहे.
धुळे शहर मतदार संघात विकासकामांची जोरदार सुरुवात करीत असतांना हद्दवाढ गावांचा प्रश्न अनुत्तरीत राहू नये या भूमिकेतून आमदार फारुख शाह (mla farukh shaha) यांनी हद्दवाढीने महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांसाठी ग्रामविकास विभागाकडून स्वतंञपणे निधी खेचून आणला आहे. ग्रामविकास विभागाकडील निधीतून वडजाई रस्ता ते दर्गा कॉंक्रीटीकरणाचे काम प्रस्तावित आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत होणाऱ्या 38 लाख 35 हजार 461 रुपये खर्चाच्या कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आला.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता श्री. लोकरे, नगरसेवक नासिर पठाण, मूक्तार अन्सारी, नगरसेवक गनी डॉलर, नगरसेवक सईद बेग, डॉ. दीपश्री नाईक, डॉ.पवार, प्यारेलाल पिंजारी, मौलवी शकील, रियाज अली, आमिर पठाण, साजिद साई, साबीर सैय्यद, निजाम सय्यद, इकबाल शाह, आसिफ शाह, जमील खाटिक, युसुफ पापा, वसिम अक्रम, हालिम शमसुद्दिन, नाजिम शेख, रिजवान अन्सारी, माजीद पठाण, मुस्ताक पहिलवान, साकिब शाह, फरिदा अन्सारी, रईस शेख, साजिद बाबा, नासिर बागवान, सलीम शेख, जावेद मेमन, लुकमान शेख आदी उपस्थित होते.