#Toll booths are rigged to the tune of lakhs, so you get tolls collected over the years
टोल नाक्यांवर लाखोंची हेराफेरी चालते, म्हणून तुमच्याकडून वर्षानुवर्षे टोल वसुली होते…
#Dhule Crime धुळेः येथील लळींग टोल नाक्यावरील एका अधिकार्याला तब्बल सात लाख रुपयांची लाच स्विकारताना पकडल्याने, टोल वसुलीतील गैरव्यवहाराचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. टोल नाक्यांवर लाखोंची हेराफेरी होत असल्यानेच आपल्याकडून वर्षानुवर्षे टोल वसुली सुरुच असते. यामुळे वाहन मालकांना नाहक आर्थिक भूर्दंड सोसावा लागतो.
काय आहे प्रकरण?
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनच्या चौपदरीकरणाचे काम इरकाॅम सोमा टोल वे कंपनीने बीओटी तत्वावर केले आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाशी (NHAI) या कंपनीने तसा करार केला आहे. परंतु इरकाॅन कंपनीने राजस्थानच्या उदयपूर येथील कोरल असोसिएट्स या कंपनीला 22 आॅगस्ट 2022 पासून चांदवड टोल नाक्याचे संपूर्ण व्यवस्थापनाचे काम दिले आहे. तेव्हापासून ते जानेवारी 2023 पर्यंतची रक्कम अदा करण्यासाठी इरकाॅन कंपनीच्या अधिकार्यांनी कोरल कंपनीकडून लाच मागातली. तसेच लळींग टोल प्लाझा व्यवस्थापनाचा ठेका मिळण्यासाठी भरलेली निविदा मंजूर करण्याकरिता देखील कोरल कंपनीकडे पैशांची मागणी करण्यात आली. या दोन कामांसाठी सुमारे सात लाख रुपयांची मागणी केली होती. यासंदर्भात कोरल कंपनीच्या एका अधिकार्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार दाखल केली. खरोखर लाच मागितल्याबद्दल खाञी झाल्यानंतर धुळे एसीबीने ठरल्याप्रमाणे तक्रारदाराला लाचेची रक्कम देण्यासाठी पाठविले. त्यानुसार लळींग टोल प्लाझा कार्यालयात 21 फेब्रुवारी रोजी सापळा रचला आणि इरकाॅन कंपनीचा हरिश सत्यवली याला लाच स्विकारताना रंगेहात पकडले. त्याने स्वतःसाठी दोन लाख तर कंपनीचा संचालक प्रदीप कटीयार याच्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केली होती, अशी माहिती एसीबीने दिली. दोघांविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
सापळा यशस्वी करणारे एसीबीचे पथक
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे, पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, राजन कदम, शरद काटके, संतोष पावरा, भुषण खलाणेकर, भूषण शेटे, गायत्री पाटील, रोहीणी पवार, रामदास बारेला, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर, प्रशांत बागुल, मकरंद पाटील यांनी केली. या पथकाला एसीबी नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक नारायण न्याहाळदे, वाचक पोलीस उप अधीक्षक नरेंद्र पवार यांचे मार्गदर्शन लाभले.
…तर वर्षानुवर्षे टोल वसुली सुरुच राहिल
सन 2005 च्या सप्टेंबर महिन्यात बीओटी तत्वावर महामार्ग चौपदरीकरणाचा करारनामा केला आहे. धुळे, सोनगिर, शिरपूर, चांदवड या टोल नाक्यांवर टोल वसुलीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार असल्याच्या तक्रारी आहेत. अनेक वाहने फास्ट टॅग बायपास करुन आणि पावती न देता तडजोडीची रक्कम वसुल करुन सोडली जात असल्याचीही ओरड आहे. तसेच प्रत्यक्षात होत असलेली टोल वसुली आणि NHAI ला सादर होणारे रेकाॅर्ड यातील रक्कमेमध्ये मोठी तफावत असल्याचीही ओरड आहे. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर, रोड बांधकामासाठी दहा रुपये खर्च झाले असताना, एक लाख रुपये वसुली झाली तरी कंपनी केवळ पाच रुपये वसुली दाखवेल आणि वर्षानुवर्षे ही वसुली सुरुच असेल. त्यामुळे या टोल नाक्यांना माहिती अधिकाराचा चाप लावण्याची गरज आहे.
Editor
Sunil Ananda Baisane
No1 Maharashtra