blood-donation-camp-organized-by-jawahar-medical-foundation-on-the-occasion-of-shiv-jayanti-at-narwhal
नरव्हाळ येथे शिवजयंतीनिमित्त जवाहर मेडीकलतर्फे रक्तदान शिबीर
#Dhule धुळे: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने धुळे तालुक्यातील नरव्हाळ येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. जवाहर मेडीकल फौंडेशनचे चेअरमन आ. कुणाल पाटील (mla kunal patil) यांच्या नेतृत्वाखाली आणि डॉ. ममता पाटील (Dr. mamata patil) यांच्या मार्गदर्शनाखाली जवाहर मेडीकल फौंडेशनचे कै. आण्णासाहेब चुडामण पाटील वैद्यकीय महाविद्यालय मोराणे प्र. ल. धुळेतर्फे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.
यावेळी नरव्हाळ येथील सरपंच अर्चना सुधिर कचवे यांच्यासह नरव्हाळ ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. रक्तदान शिबीराच्या यशस्वीतेसाठी नवनाथ कचवे, गौरव कचवे, विजय कचवे, शरद कचवे, अमोल पाटील, डॉ.संदिप शिंदे, हेमंत पाटील यांनी परिश्रम घेतले.