Climax of brutality, crushed to death by a stone, suspected of murder by two men after a party
निर्दयीपणाचा कळस, दगडाने इतके ठेचले की शिर धडावेगळे झाले, पार्टीनंतर दोन मिञांनी खून केल्याचा संशय
#Dhule Crime धुळेः शहरापासून जवळच असलेल्या अवधान शिवारात सतिष बापू मिस्तरी (वय 30, रा. मोहाडी उपनगर, धुळे) या तरुणाचा निर्घून खून (#murder) केल्याची घटना बुधवारी राञी घडली.
गुरुवारी सकाळी बकर्या चारणार्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला मृतदेह दिसला. पोलिस घटनास्थळी आल्यावर ते देखील हादरले. खून करताना निर्दयीपणाचा कळस गाठल्याचे दिसले. मोठ्या दगडाने इतके ठेचले होते की धडावेगळे झालेले शिर चेंदामेंदा झाले होते. हातावर नाव गोंदल्याने मृतदेहाची ओळख पटली. मृत तरुणाच्या वडिलांनी आणि भावाने घटनास्थळी केलेला आक्रोश मन हेलाऊन टाकणारा होता.
मिञांनी खून केल्याचा संशय
सतिष मिस्तरी हा तरुण बुधवारी दुपारपासून घरातून बाहेर पडला होता. एका अवैध खेळात तो हजारो रुपये जिंकला होता अशी चर्चा आहे. घटनास्थळी बियरचे तीन कॅन आणि तीन ग्लास आढळले आहेत. त्यामुळे पार्टी केल्यानंतर मिञांनी त्याचा खून केला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. फाॅरेन्सिक टिमने घटनास्थळावरुन अनेक नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. याप्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यात (#mohadi police) भारतीय दंड विधानाच्या (IPC) कलम 302 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मारेकर्यांचा शोध पोलीस घेत आहेत.