Fund of 10 crores for 23 dams, works of storage dam started, follow up by MLA Kunal Patil
23 बंधार्यांसाठी सव्वा दहा कोटींचा निधी, साठवण बंधार्याची कामे सुरु, आमदार कुणाल पाटील यांचा पाठपुरावा
#Dhule धुळेः तालुक्यातील शिरधाणे प्र.डा. आणि विश्वनाथ येथे धुळे ग्रामीणचे आ.कुणाल पाटील (mla kunal patil) यांच्या प्रयत्नाने मंजुर करण्यात आलेल्या काँक्रीट साठवण बंधार्यांचे भूमीपुजन करण्यात आले. दरम्यान महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकूण 23 बंधारे मंजुर करण्यात आले आहेत त्यासाठी एकूण 10 कोटी 30 लक्ष रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे.
धुळे तालुक्यातील सिंचनाचे क्षेत्र वाढावे आणि त्यातून शेतीचे बागायती क्षेत्रात वाढ होवून शेतकरी सुखी संपन्न व्हावा यासाठी आ.कुणाल पाटील सिंचनाच्या कामांना प्राधान्य देत असतात. त्या अनुषंगाने महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात मंजुर करण्यात आलेल्या शिरधाणे प्र.डा.येथील कन्हेरी नदीवरील गेटेड सिमेंट काँक्रीट बंधारा(मंजुर निधी 73 लक्ष 36 हजार रु.) व विश्वनाथ येथे गाव नाल्यावर काँक्रीट बंधारा(एकूण 30 लक्ष 14 हजार रु.)भुमीपुजन नुकतेच करण्यात आले. या बंधार्यांच्या कामामुळे शेती सिंचनाखाली येणार आहे.
भुमीपूजन कार्यक्रमाला खरेदी विक्रीचे चेअरमन लहू पाटील, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष के. डी. पाटील, विशेष कार्य अधिकारी प्रकाश पाटील, मनोज पाटील, रावसाहेब पाटील, माजी सरपंच सुरेश पाटील, सरपंच कांतीलाल पाटील, उपसरपंच विलास गुजर, सरपंच गुलाबराव पाटील, उपसरपंच ज्ञानेश्वर पाटील, ग्रामपंचायत सदस्य मनोहर पाटील, पंकज पाटील, वाल्मिक पाटील, महेंद्र पाटील, ज्ञानेश्वर पाटील, गणेश पाटील, संजू टेलर, नगराज पाटील, आत्माराम पाटील, विजय पाटील, महेंद्र पाटील, शांतीलाल पाटील, योगेश पाटील, स्वियसहाय्यक रामकृष्ण पाटील, भैय्या भिल, संदिप पाटील, धोंडू पाटील, शांतीलाल पाटील, विष्णू पाटील, अशोक पाटील, प्रकाश पाटील, चैत्राम पाटील, संतोष जोशी, राजेंद्र पाटील, दिलीप पाटील, नाना पाटील यांच्यासह शेतकरी व सिंचन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
23 बंधार्यांना मंजूरी
धुळे ग्रामीणचे आ. कुणाल पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने महाविकास आघाडी सरकारच्या काळात दि. 2 जानेवारी 2021 रोजी धुळे तालुक्यातील एकूण 23 बंधार्यांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यात मांडळ, कुळथे(2 बंधारे), बोरकुंड, विंचुर, फागणे(2 बंधारे),रावेर, तिखी, रामी, अंबोडे (2बंधारे), शिरधाणे प्र.डा., सायने, विश्वनाथ (2बंधारे), वार, दोंदवाड, वजीरखेडे, कापडणे, निमगुळ, मोरदड(2 बंधारे) गावाच्या शिवारातील नाल्यांवरील बंधार्यांचा समावेश आहे. या कामांमुळे बंधार्यांच्या परिसरातील 155 हेक्टर शेती सिंचनाखाली येण्यास मदत होणार आहे. या कामांसाठी आ. कुणाल पाटील यांनी जलसंधारण मंत्रालयाकडून एकूण 10 कोटी 30 लक्ष 25 हजार रुपयांचा निधी मंजुर करुन घेतला आहे.