The semi-naked protest of the retired public works employees became an eye-catcher सार्वजनिक बांधकामच्या सेवानिवृत्त कर्मचार्यांचे अर्धनग्न आंदोलन ठरले लक्षवेधी
Dhule News धुळेः सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (pwd) सेवानिवृत्त स्थापत्य अभियांञिकी सहायकांनी शुक्रवारी बांधकाम भवनासमोर अर्धनग्न आंदोलन करीत, आपल्या प्रलंबित मागण्यांकडे शासन, प्रशासनासह नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. सेवानिवृत्त कर्मचार्यांनी शुक्रवारी राज्यव्यापी आंदोलन केले. कर्मचार्यांचे पदनामांतर करुन समकक्ष स्थापत्य अभियांञिकी सहायक पदावर 1989 पासून समाविष्ट करावे आणि त्यानुसार वेतन निश्चिती करावी, 1994 पासून कालबध्द पदोन्नतीनुसार वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ द्यावा, सन 2006 पासून वरिष्ठ वेतनश्रेणीचा दुसरा लाभ द्यावा, 2006 ते 2010 या कालावधीसाठी काल्पनिक वेतनवाढीचा फरक रोखीने द्यावा आदी मागण्या आहेत. आंदोलनात सेवानिवृत्त स्थापत्य अभियांञिकी कृती समितीचे जी. यू. पाटील, एस. एस. ठाकरे, शाम अहिरे, एस. के. भोई, डी. के. सोनकांबळे, यशवंत ठाकरे, पी. झेड. गोसावी, एस. यु. जोहरी, आर. सी. विसपूते, वाय. एस. ठाकरे, शाम अहिरे, एम. आर. पाटील, डी. आर. पाटील, पी. बी. बारी, ए. डब्ल्यू. सूर्यवंशी, आर. बी. सोनार, एल. जी. गवळी, एस. के. गोसावी आदी सहभागी झाले होते.