BJP MPs criticize MIM MLAs भाजप खासदारांची एमआयएम आमदारांवर टिका
#धुळेः रयतेचे राजे छञपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी निघालेल्या मिरवणुकीवर समाजकंटकांनी केलेल्या दगडफेकीचा भारतीय जनता पार्टीने तीव्र शब्दात निषेध करीत, एमआयएम आमदार, काॅंग्रेस, राष्ट्रवादी आणि उध्दव ठाकरे सेनेवर रविवारी जोरदार टिका केली.
धुळे शहरात पारोळा रोडवरील राम पॅलेस येथे भाजपचे प्रदेश महामंञी विजय चौधरी यांच्या उपस्थित कार्यकर्ता मेळावा झाला. तत्पूर्वी झालेल्या पञकार परिषदेत #विजय चौधरी यांनी पक्षाची भूमिका आणि आपल्या दौर्याविषयी माहिती दिली. शिवजयंतीला घडलेल्या घटनेचा निषेध करीत, दगडफेक करणारे देशद्रोही असून, त्यांना देशात राहण्याचा अधिकार नसल्याचे ते म्हणाले.
खासदार सुभाष भामरे यांनी #आमदार फारुख शाह यांच्यावर टिका केली. शिवजयंतीवर दगडफेक झाल्यानंतरही आमदारांनी साधा निषेधही केला नाही. त्यामुळे त्यांची भूमिका उघडी पडली आहे. या घटनेच्या तक्रारी वरीष्ठ स्तरावर पाठविल्या असून, समाजकंटकांना माफ केले जाणार नाही. दगडफेक झाल्यानंतरही संयम ठेवणार्या आयोजकांचे आणि धुळेकरांचे त्यांनी कौतुक केले.
भाजप महानगर अध्यक्ष अनुप अग्रवाल (#anup agrawal) यांनी देखील आमदारांवर टिका केली. आमदारांनी काहिही आरोप केला असला तरी, अतिक्रमण हा केवळ एका धर्माचा विषय नाही. चाळीसगाव रोडवर हिंदूंचेही अतिक्रमण काढले आहे. शनिवार आणि रविवारची सुटी संपल्यांतर मोहिम जोरात सुरु होईल. पहिल्या टप्प्यात नगावबारी ते एकविरा देवी मंदिरापर्यंतचे अतिक्रमण हटविले जाणार आहे. ही मोहिम राबविताना कोणताही भेदभाव केला जाणार नाही. विशिष्ट समाजाच्या लोकांचे सर्वाधिक अतिक्रमण हा त्यांचा दोष आहे. छञपती शिवाजी महाराजांच्या राज्यात त्यांच्याच मिरवणुकीवर दगडफेक होत असताना काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि ठाकरे सेनेने साधा निषेध नोंदविला नाही. या राजकीय पक्षांमध्ये हिंदू नाहीत का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
पञकार परिषदेला महापौर प्रतिभा चौधरी, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, भाजप जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, माजी जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अश्विनी पवार आदी उपस्थित होते.