Sant Nirankari Mission’s ‘Swachh Jal Swachh Man’ संत निरंकारी मिशनचे ‘स्वच्छ जल स्वच्छ मन’ अभियान, पाझरा नदीचे पाञ केले स्वच्छ
#धुळेः संत निरंकारी मिशनमार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त’अमृत परियोजने अंतर्गत रविवारी धुळ्यात स्वच्छ अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. जल संरक्षण आणि जल बचाव करण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचे नियोजन करून ते कार्यान्वित करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. यामध्ये जलाशयाची स्वच्छता आणि स्थानिक जनतेमध्ये जागृती अभियान राबवून जनसामान्यांना प्रोत्साहित करणे हा केंद्रबिंदू आहे. बाबा हरदेवजी यांनी आपल्या कार्यकाळात समाजकल्याणाचे अनेक उपक्रम राबविले. त्यामध्ये स्वच्छता व वृक्षारोपण अभियान याची सुरवात प्रमुख आहे. त्यांच्याच शिकवणूकीतून प्रेरणा घेत दरवर्षी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या निर्देशनानुसार विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असून यावर्षी अमृत परियोजनेचे आयोजन करण्यात आले. देशभरात 27 राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील 730 शहरांमध्ये जवळपास 1000 ठिकाणी हे अभियान राबविण्यात येत आहे. या परियोजने अंतर्गत निरंकारी मिशनचे सुमारे दीड लाख स्वयंसेवक समुद्र किनारे, नद्या, सरोवरे, तलाव, विहीरी, झरे, नाले आणि जलवाह इत्यादिंची स्वच्छता करून ते निर्मळ बनवतील. तसेच जल संरक्षणाची प्रेरणा देतील. मिशनच्या जवळजवळ सर्व शाखा यामध्ये सहभागी झाल्या आहेत. धुळे शहरात पांझरा नदीच्या काठी कालीका मंदिर ते लहान पुलापर्यंतची स्वच्छता मोहिम क्षेत्रीय प्रभारी हिरालाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आली. यात धुळे साध संगत, SNCF सदस्य, संपादन अधिकारी, सेवादल सदस्य यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला. यामध्ये स्थानिक तसेच अन्य निरंकारी भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले.