Astronomers prepare to cool the sun’s rays खगोल शास्ञज्ञ करताहेत सूर्यकिरणे थंड करण्याची तयारी
सूर्य आपल्या सौरमालेचा राजा आहे. सूर्य नसला तर सृष्टीचा विनाश होईल.
आपला दिनक्रम आणि आपले सारे जीवन सूर्यचक्रानुसार चालते.
संशोधनाच्या नावाखाली निसर्गाशी केलेली छेडछाड घातक ठरु शकते, असे शास्ञज्ञांचा एक गट सांगतो.
#Washington वाॅशिंग्टनः सध्या जगासमोर एक मोठी समस्या निर्माण झाली आहे, ती म्हणजे ग्लोबल वाॅर्मिंग. दिवसेंदिवस सूर्याचे आग ओकण्याचे प्रमाण वेगाने वाढत आहे. त्यामुळे त्याची किरणे शितल, थंड करण्यासाठी अमेरिकेतील शास्ञज्ञांचा एक गटपुढे सरसावला आहे.
माञ, यातसुध्दा दोन ळतप्रवाह आहेत. काही शास्ञज्ञांनी या अभिनव प्रयोगाला विरोध केला आहे. त्यांच्या मते, असे धाडस पृथ्वीसाठी धोकादायक आणि विनाशकारी ठरु शकते.
मीडिया रिपोर्टने दिलेल्या वृत्तानुसार, काही शास्ञज्ञ सूर्यप्रकाश आणि उष्णता घटविण्याच्या प्रकल्पावर काम करत आहेत. सूर्याची उष्णता कमी झाल्यास पृथ्वीवरील ग्लोबल वाॅर्मिंगविरुध्दच्या मोहिमेत मोठे यश मिळेल, असा या शास्ञज्ञांचा दावा आहे. माञ, या प्रकल्पाला विरोध करणार्या शास्ञज्ञांनी म्हटले आहे की, हा प्रकल्प तातडीने थांबविला नाही, तर येणार्या काळात हे पाऊल घातक ठरु शकते. विशेष म्हणजे शास्ञज्ञांच्या दोन गटात हा वाद सुरु असताना या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली आहे.
प्रकल्पाबाबत धोक्याचा इशारा
या प्रकल्पामध्ये मोठी गुंतवणूक झाल्याने आता या प्रकल्पाच्या चर्चेलाही उधाण आले आहे. सूर्यप्रकाश कमी करण्याच्या या संशोधनाला शास्ञज्ञांनी ‘सोलर जिओ इंजिनिअरिंग’ असे म्हटले आहे. याबाबतच्या सर्व संभाव्य धोक्यांबाबत काही शास्ञज्ञांनी धोक्याचा इशारा दिल्यानंतरही या प्रकल्पावर काम करणारे शास्ञज्ञ हा प्रकल्प थांबविण्याच्या विचारात नाहीत. ते आपल्या मतांवर ठाम आहेत.
अशी सूचली कल्पना
जून 1991 मध्ये फिलीपाईन्समधील माऊंट पिनेताबू या ज्वालामुखीचा उद्रेक झाला. 20 व्या शतकातील या सर्वात मोठ्या स्फोटातून पसरलेली राख आकाशात सुमारे 28 मैल परिघात पसरली. यानंतर पुढील 15 महिने संपूर्ण जगाचे तापमान सुमारे एक अंशाने कमी झाले होते. वातावरणातील राखेमुळे सूर्याची किरणे पूर्णपणे पृथ्वीवर पोहोचू शकली नाहीत. यातूनच शास्ञज्ञांना नवी कल्पना सूचली. सूर्य आणि वातावरण यांच्यामध्ये एखाद्या गोष्टीचा थर उभा राहिल्यास सूर्याची किरणेपूर्ण शक्तीने पृथ्वीवर पोहोचणार नाहीत, असा शास्ञज्ञांचा अंदाज आहे.
दाह कसा कमी होईल?
सोलर जिओइंजिनिअरिंग म्हणून ओळखल्या जाणार्या या प्रक्रियेत शास्ञज्ञ मोठ्या फुग्याव्दारे पृथ्वीबाहेरील वातावरणाच्या वरच्या भागावर सल्फर डायआॅक्साईडची फवारणी करतीलक सूर्यकिरणांना परावर्तित करणारे आगळे गुणधर्म शास्ञज्ञांना सल्फरमध्ये आढळले आहेत. त्यामुळे सल्फर डायआॅक्साईडचा पडदा सूर्यकिरण आणि पृथ्वी यांच्यात उभा केल्यास सूर्याचा दाह कमी होईल, असे शास्ञज्ञांना वाटते.
नवे तंञ कसे काम करेल?
या प्रकल्पांतर्गत पृथ्वीच्या वातावरणाच्या वरच्या थरावर सल्फरची फवारणी केली जाणार आहे. सल्फरचा थर सूर्याच्या किरणांना परावर्तित करुन पुन्हा अंतराळात पाठवेल. परिणामी, सूर्यप्रकाश त्याच्या संपूर्ण उष्णतेसह पृथ्वीवर पोहोचू शकणार नाही. मग पृथ्वीवरील वाढत्या तापमानाला आपोआपच लगाम बसेल. या नव्या प्रयोगामुळे ग्लोबल वाॅर्मिंग रोखण्यास चांगली मदत होईल, असा विश्वास शास्ञज्ञांना वाटतो. त्यामुळेच त्यांना या प्रकल्पासाठी मोठी गुंतवणूक मिळाली असून, प्रकल्पाचे काम झपाट्याने सुरु आहे.