Why tribal brothers worship the tiger? You will be surprised to know the reason आदिवासी बांधव का करतात वाघाची पूजा? कारण जाणून आश्चर्य वाटेल
#Nandurbar नंदुरबार: जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगेत वसलेल्या धडगाव तालुक्यातील नणंद भावजाई या घाटात वाघाची पूजा करण्याची प्रथा वर्षानुवर्षे कायम आहे.
वाघाने गावशिवारातील पशु पक्षी, माणसे यांच्यावर हल्ला करू नये, गाव पाड्यात समृद्धी नांदावी यासाठी पूर्वी आदिवासीं बांधवांचे पूर्वज हे जंगलात असलेल्या वाघाचे पूजन करायचे. कालांतराने वाघ हा प्राणी सातपुड्याच्या जंगलातून नामशेष झाला असला तरी आज ही त्यांची सातपुड्याच्या पर्वत रांगांमध्ये पूजा केली जाते.
नंदुरबार जिल्ह्यातील शहादाहून धडगावकडे जाणाऱ्या घाटात वाघ देव आणि आदिवासी बांधवांची कुलदैवत देवमोगरा मातेच मंदिर बांधले असून दरवर्षी एप्रिल महिन्यात दोन दिवसीय वाघदेव यात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात होत असून या यात्रोत्सवात गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी होतात.
निसर्गाचा एक भाग असलेल्या वनांमध्ये निवास करणाऱ्या वाघाने गावशिवारातील पशु पक्षी, माणसे यांच्यावर हल्ला करू नये, गाव पाड्यात समृद्धी नांदावी यासाठी माघ महिन्यात महाशिवरात्रीपूर्वी वाग्देवता पूजन केले जाते.
वाघ देवतेचे पूजन झाल्यानंतर आदिवासी बांधव याहामोगी देवीच्या दर्शनासाठी गुजरात राज्यातील देवमोगरा याठिकाणी रवाना होतात. वाग्देवाला आदिवासी महिलांकडून बांबूच्या टोपलीत आणलेले धनधान्य आणि महू फुलाची दारू यांचा नैवेद्य दाखवला जातो. हा नैवेद्य दाखवल्यानंतर ठिकठिकाणी यात्रोत्सवांना प्रारंभ होत असून पूजन करण्याची परंपरा शेकडो वर्षांपासून आदिवासी बांधवांचे सुरु आहे. श्रद्धास्थान असलेल्या तालुक्यातील देवबारा येथील मंदिराच्या परिसरात विविध सुविधांची वानवा असल्याने या मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची मागणी आहे.
आदिवासी बांधवांची श्रद्धा असलेल्या वाग्देव मंदिरात दरवर्षी शेकडो भाविक हजेरी लावतात. पारंपरिक सण उत्सवावेळी या ठिकाणी वर्दळ असते. लांबवरून येणाऱ्या भाविकांना अनेकवेळा सुविधा न मिळाल्याने ते परत जात असतात. शासनाने येथे सुविधा दिल्यास भाविकांची सोय होऊन या परिसराचा विकासही होणार असल्याचे भाविक सांगतात.