Why do youths in the dust bring swords? Do they want to go to war or create riots?? धुळ्यातील तरुण तलवारी का आणताहेत? त्यांना युद्ध करायला जायचयं की दंगली घडवायच्यात??
#Dhule Crime धुळे: शहर आणि परिसरातील तरुण पिढी हिंस्रपणा तसेच अमानुष वृत्तीच्या आहारी जात असल्याचे चित्र आहे. गेल्या आठवड्यात मोहाडी उपनगर व अवधान शिवारातील दहा तरुणांना डझनभर तलवारी आणि शस्त्रसाठ्यासह पोलिसांनी पकडल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी पुन्हा मोहाडी येथील आणखी एका तरुणाला दोन धारदार तलवारींसह घरातून अटक करण्यात आली.
दंडेवाला बाबानगरात राहणारा हा तरुण मजूर असून निखिल शांताराम अहिरे असे त्याचे नाव आहे. या तरुणाकडे तलवारी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार धुळे क्राईम ब्रांचने घरावर छापा टाकला व दोन धारदार तलवारी जप्त केल्या. धुळ्यातील तरुण पिढीत सध्या शस्त्रास्त्रे बाळगण्याची क्रेझ आहे. या तलवारी घेऊन त्यांना युद्ध करायला जायचयं की दंगली घडवायच्यात असा प्रश्न पडतो. त्यांची ही हौस दोन दंगलींची पार्श्र्वभूमी असलेल्या धुळे शहरासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणांकडे केवळ कारवाई म्हणून न पाहता तलवारी शोधण्याच्या मोहिमेला व्यापकता देण्याची गरज आहे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.