Residents of Shastrinagar were fed up, remove us from the municipal area! Finally the MLAs gave the funds शास्त्रीनगरातील रहिवासी वैतागले होते, आम्हाला महानगरपालिका क्षेत्रातून काढून टाका! अखेर आमदारांनी दिला निधी
#Dhule धुळे : शहरातील शास्त्रीनगर हा भाग शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी वसलेला आहे. मात्र, आजपर्यंत शास्त्रीनगरमध्ये महानगरपालिकेने कुठल्याच प्रकारच्या सोयीसुविधा, रस्ते, गटारी केलेल्या नाहीत. मनपा सुविधा देत नाही म्हणून नागरिकांनी वैतागून काही दिवसांपूर्वी धुळे महानगरपालिकेचे महापौर यांना निवेदन दिले होते की आम्हाला महापालिका क्षेत्रातून काढून ग्रामीण भागात टाका.
नागरिकांची गरज ओळखून आमदार फारुख शाह यांनी शास्त्रीनगर परिसरात स्थानिक विकास निधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यासाठी ३४ लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला. शास्त्रीनगर परिसरात स्थानिक विकास निधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना अंतर्गत सुमारे ३४ लक्ष निधीतून रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले. या कामांचे लोकार्पण आ. फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजेंद्र चितोडकर, संपादक राजेंद्र गर्दे, राज चव्हाण, बाळासाहेब निकुंभ, बाजीराव खैरनार, नेरकर, पाटकर, मधुकर कांबळे, जगताप, युसुफ पापा, आसिफ शाह, कैसर अहमद, फकिरा बागवान, चित्रा चीतोडकर, साधना परदेशी, रेखा सोनवणे, सुनंदा राजपुत, शितल सोनजे, अनु नेरकर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.