धुळे शहरासाठी अर्थसंकल्पात १०५ कोटी रुपये मंजुर
धुळे: शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असलेले आमदार फारुख शाह यांच्या प्रयत्नाने धुळे शहराच्या विविध विकासकामांसाठी ९ मार्च रोजी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात १०५ कोटी रुपये शासनाकडून मंजुर करण्यात आलेले आहेत. आमदार फारुख शाह यांच्या पाठपुराव्याअंती राज्य शासनाने धुळे शहरातील सर्व शासकीय कार्यालय एकाच छताखाली येण्यासाठी सादर केलेल्या मुख्य प्रशासकीय संकुलासंबंधी प्रस्तावास शुक्रवारी दि.२४ फेब्रुवारी रोजी ४५ कोटीचा निधीला ही मंजुरी दिली होती.
धुळे शहरातील भाडे तत्वावर असलेले सर्व शासकीय निम शासकीय कार्यालय एकाच छताखाली येण्यास मंजुरी देण्यात आली आहे. शहरातील भाडे तत्वावर असलेले सर्व शासकीय निम शासकीय कार्यालये साधारणतः ३८ ठिकाणी शासनाचे भाडेतत्वावर घेतलेले वेगवेगळे कार्यालये आहेत. या कार्यालयांच्या भाड्या पोटी शासनाला दर माहे ४० ते ५० लाख रुपये द्यावे लागतात. तसेच ही संपुर्ण कार्यालये शहरात दूर दूर पर्यंत विखुरलेली असल्याने जनतेला दैनंदिन कामे करण्यासाठी हेलपाटे मारावे लागतात त्यामुळे जनतेच्या पदरी मनस्तापच येतो तसेच जनतेचा पैसा आणि वेळ वाया जातो.जनतेची कामे एकाच छताखाली व्हावी त्यांना विविध ठिकाणी फिरावयास लागु नये यासाठी शासनाने विविध खात्यांची कार्यालये एकत्र आणण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यासाठी धुळे शहरातील (बस स्थानक व रेल्वे स्थानकाजवळ) सर्वे क्रमांक ३५१२ या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नियोजित जागेच्या ठिकाणी व्हावे जेणेकरून धुळे शहरातील भाडे तत्वावर असलेले सर्व शासकीय कार्यालये एकाच छताखाली येतील व शासनाचा खर्च होणारा पैसा वाचेल म्हणून धुळे शहरातील भाडे तत्वावर असलेले सर्व शासकीय कार्यालये एकाच छताखाली आणण्यासाठी प्रशासकीय संकुलाच्या बांधकामासाठी ४५ कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. यामुळे प्रशासकीय संकुल बांधण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. त्याचबरोबर रेसिडेन्सी पार्कच्या मागे होणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क इमारतीसाठी कार्यालयासाठी ८.५० कोटी रुपयांची देखील तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
तसेच विशेष तरतुदी अंतर्गत एमआयडीसी विभागीय कार्यालयासाठी २१ कोटी आणि १८ कोटी रुपये एमआयडीसी फायर स्टेशनसाठी आणि धुळे शहराच्या मध्यभागातून जाणारा हाग्रा नाला ते हायवेपर्यंतच्या मॉडेल रोडसाठी १२ कोटी रुपये मंजुर करण्यात आलेले आहे. यासर्व कामांसाठी आमदार फारुख शाह हे सुमारे ३ वर्षापासून कार्यरत होते. धुळे शहरात मोठे उदयोग धंदे येत आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यासाठी स्वतंत्र कार्यालयाची आवश्यकता आहे. सद्यस्थितीत दोन – तीन जिल्ह्यांचा कार्यभार एकाच वास्तूतून केला जात आहे. त्यामुळे एकूणच कार्यालयीन कामकाजावर विपरीत परिणाम होत असल्याने. धुळे M.I.D.C. साठी स्वतंत्र व सुसज्ज विभागीय कार्यालय ईमारत बांधणेसाठी निधी उपलब्ध करून देणेत यावा. तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी मधुर इंडस्ट्रीज आणि केशरानंद जिनिंगला प्रमाणात आग लागली होती. या ठिकाणी धुळे महानगरपालिकेतून अग्निशमन दलाच्या गाड्या बोलावल्या होत्या परंतु धुळे शहरातून एम. आय. डी. सी. कडे जाणारा रस्ता हा खूप जास्तीचा वर्दळीचा व शहरापासून १० किमी अंतराचा असल्यामुळे अग्निशमनची गाडी वेळेवर घटनास्थळी पोहचली नाही. परीणामी मोठ्या प्रमाणात उद्योजकांचे नुकसान झाले. या घटनेमुळे फायर स्टेशनची आवश्यकता असल्याचे आमदार फारुख शाह यांनी निदर्शनास आणून दिले होते. तसेच तसेच एम.आय.डी.सी. तील सर्व औद्योगिक संघटना मागील सात वर्षापासून व मी गेल्या वर्षभरापासून स्वतंत्र फायर स्टेशन होण्याकामी प्रयत्नशील आहोत. आँगस्ट २०१६ मध्ये औद्योगिक संघटनांनी फायर सेस भरण्यास तयार असल्याचा ठराव केला. या ठरावाचे पत्र एमआयडीसी प्रशासनाला दिल्या नंतरही सहा वर्षाचा कालावधी उलटला असूनही फायर स्टेशन झाले नाही. तरी अश्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अवधान एम. आय. डी. सी. धुळे येथे स्वतंत्र फायर स्टेशन उभारण्यात यावे. या संदर्भात आ.फारुख शाह यांनी मुख्यमंत्री महोदयांकडे मागणी केली होती. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री महोदयांनी मालेगाव येथील नाशिक विभागीय आढावा बैठकीत उद्योगमंत्री ना.उदय सामंत यांना तत्काळ या विषयावर निर्णय घ्यावा असे आदेश दिले होते. त्यानुसार उच्चस्तरीय समितीने मंजुरी दिल्यानंतर अर्थसंकल्पात एमआयडीसीसाठी विशेष तरतूद अंतर्गत विभागीय कार्यालयासाठी २१ कोटी तसेच फायर स्टेशन इमारत, २ अग्निशमन बंब आणि एक रुग्णवाहिका यासाठी १३ कोटी मंजुर करण्यात आलेले आहे. धुळे शहराच्या मध्यभागातून सुरत-नागपुर महामार्ग जातो. यापुर्वी हॉटेल कृष्णाई ते महानगरपालिकेपर्यंत चे काम करण्यात आले होते. पुढील भागाचे जुने जिल्हाधिकारी कार्यालय ते हाग्रा नालापर्यंत चे काम मनपाच्यावतीने मुलभूत सोई सुविधा अंतर्गत केले जाणार आहे. हाग्रा नाला ते हायवेपर्यंत मॉडेल रोड तयार करणे हे काम अर्थसंकल्पात मंजुर झाल्याने धुळे शहरातून जाणारा संपुर्ण सुरत-नागपुर हायवे चे काम या निमित्ताने होणार आहे.
I needed to thank you for this wonderful read!! I certainly enjoyed every bit of it. I have you saved as a favorite to look at new things you postÖ