Pallavi Renake statment शिंदे-फडणवीस सरकारच्या कामाबद्दल काय म्हणाल्या पल्लवी रेणके
#Dhule धुळे: महाविकास आघाडी सरकारने उभं केलेलं काम विकण्याचा काम शिंदे-फडणविस सरकार करीत आहे, अशी जोरदार टिका काँग्रेसच्या भटक्या विमुक्त जाती जमाती सेलच्या प्रदेशाध्यक्षा पल्लवी रेणके यांनी शुक्रवारी धुळ्यात केली.
महाविकास अाघाडीच्या काळात काढण्यात अालेले क्रांतीकारी अादेश,निर्णय रद्द करून नव्याने तेच अादेश काढून काॅग्रेसला बदनाम करण्याचे व जनतेची दिशाभूल करण्याचे काम राज्यातील शिंदे,फडणवीस सरकारकडून केले जात अाहे, असा अाराेप काॅग्रेसच्या भटक्या विमुक्त अाघाडीच्या प्रदेशाध्यक्षा अॅड. पल्लवी रेणके यांनी केला. भविमअाच्या प्रदेशाध्यक्षपदी प्रथमच महिलेची निवड झाली अाहे. नियुक्तीनंतर त्या प्रथमच उत्तर महाराष्ट्राच्या दाैऱ्यावर अाल्या अाहेत. त्यांच्या उपस्थितीत काॅग्रेस भवनात मेळावा झाला.
याप्रसंगी जिल्ह्यातील सेलची स्थिती, पूर्नबांधणी अादीबाबतचा अाढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.याप्रसंगी अॅड.पल्लवी रेणके यांनी सांगितले की, केंद्राच्या सामाजिक न्याय विभागाकडून पाठविण्यात अालेल्या पत्रानुसार भटक्या विमुक्त जातीचे घराेघरी जावून सर्वेक्षण करण्याची सूचना देण्यात अाली हाेती. हे पत्र राज्याला १८ अाॅगस्ट २०२० राेजी प्राप्त झाले हाेते. त्यासाठी यंत्रणा ही राज्य सरकारची वापरण्यात येणार हाेती. तर निधि केंद्राकडून दिला जाणार हाेता.परंतु काेराेनामुळे अाघाडीच्या काळात ते काम झाले नाही.त्यानंतर राज्यात शिंदे, फडणवीस सरकार अाले. केंद्रातील भाजपाचे अादेश असल्याने त्याची अंमलबजावणी तातडीने हाेईल अशी अपेक्षा हाेती.मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात अाले. त्यासंदर्भात उदासिनता दाखविली गेली.तेच अर्थसंकल्पात धनगर समाजाला अनुसूचित जातीच्या २१ याेजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात अाला.त्यासाठी १ हजार काेटीचीही दिले. परंतु यासंदर्भातील जी.अार. हा मविअाच्या काळात काढण्यात अाला हाेता. त्याला स्थगिती देवून नव्याने अादेश काढीत दिशाभूल करण्याचा व काॅग्रेसला बदनाम करण्याचे काम राज्य सरकार करीत असल्याचा अाराेपी पल्लवी रेणके यांना केला.
याप्रसंगी त्यांच्यासमवेत रमेश श्रीखंडे,जिल्हाध्यक्ष अॅड.सुधीर जाधव, काॅग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष बादल गायकवाड हे उपस्थित हाेते.
Nice post. I learn something new and challenging on blogs I stumbleupon every day. Its always useful to read through content from other writers and use a little something from their websites.