MLA’s sharp reply to guardian minister Girish Mahajan’s criticism पालकमंत्री गिरीश महाजनांच्या टीकेला आमदारांचे चोख प्रत्युत्तर
#Dhule धुळे: गेल्या आठवड्यात गारपीटग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी आलेले पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आमदार फारूक शाह यांच्यावर विकासकामांच्या श्रेयावरुन जोरदार टिका केली होती. (Video पहा) या टीकेला आमदारांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. धुळे शहरात सोमवारी विकासकामांच्या शुभारंभ प्रसंगी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
आमदार फारूक शाह यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतून वडजाई रोडवरील बोरसे कॉलनी गुलशनाबाद २००० वस्ती शब्बीर नगर येथे काँक्रीट गटार करणे या कामाचा आमदार फारूक शाह यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या भागात पावसाळ्यात पावसाचे पाणी तुंबत होते आणि हा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. तेथे नविन काँक्रीट गटार व्हावी अशी मागणी होती. याठिकाणी गटार नसल्याने आणि पाणी जमत असल्याने रस्त्याची देखील दुरवस्था झालेली होती. येणा-या जाणाऱ्या नागरिकांना त्या रोडवरून जातांना लहान मोठे खड्डे व जमेलेले पाणी यातून वाहने घेऊन जाणे या सारख्या अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. या ठिकाणी मागील काही आठवड्यांपूर्वी आमदार फारूक शाह यांना तेथील नागरिकांनी तक्रार व मागणी निवेदन दिले होते. यावरून आमदार फारूक शाह यांच्या आदेशावरून त्या भागातील रस्ते व गटारीसाठी आमदार कार्यालयामार्फत पाहणी करण्यात आली होती. त्यानंतर त्या भागातील गटारीचे काम लवकरात लवकर करणार असा शब्द आमदार फारूक शाह यांच्यावतीने देण्यात आला होता. त्याच अनुषंगाने शब्बीरनगर येथे काँक्रीट गटार करणे या कामाचा आमदार फारूक शाह यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
या कामाच्या उद्घाटना प्रसंगी मनपाचे नासिर पठाण, माजी नगरसेवक आमिर पठाण, प्यारेलाल पिंजारी, ईब्राहीम ठेकेदार, नाजीम शेख, आसिफ शाह, शोएब मुल्ला, फकिरा बागवान, चिंटू हाजी अजिज शेख, डॉ. शकील शेख, आमिर सय्यद, जाकिर शेख, अझर खान, मुंशी शेख, मझहर मंसुरी, दानीश शेख, वासिम सैय्यद, परवेज शेख, सत्तार शेख, कलिमुद्दिन शेख, आसिफ शेख, अबरार सैय्यद, सज्जाद सैय्यद, अब्दुल मुगनी मुकादम, सलमान अन्सारी आदींसह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.