Youth Congress will besiege the Vidhan Bhavan युवक काँग्रेस विधानभवनाला घेराव घालणार
#Dhule धुळे : अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सरकारने शेतकर्यांना वार्यावर सोडले आहे. युवकांना सरकारी नोकर्या नसल्याने बेरोजगारी वाढली आहे. पेट्रोल,डीझेल,गॅसची दिवसेदिवस भाववाढ होत आहे.राज्यात सरकारी यंत्रणांचा गैरवापर करुन व्देषाचे राजकारण सुरु आहे. त्यामुळे अन्यायाविरुध्द वाचा फोडण्यासाठी 21 मार्च रोजी महाराष्ट्रातील युवक विधान भवनाला घेराव घालणार, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी धुळ्यात झालेल्या युवा संवाद मेळाव्यात दिली.
धुळे जिल्हा युवक काँग्रेसच्यावतीने 15 मार्च रोजी काँग्रेस भवन धुळे येथे सायंकाळी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या उपस्थितीत युवा संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित युवकांसमोर बोलतांना कुणाल राऊत म्हणाले कि, काँग्रेस पक्षाच्या बळकटीकरणासाठी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी माझे गाव माझी शाखा चळवळ राबवावी. देश हुकूशाहीच्या दिशेने जात आहे. त्यामुळे देशातील लोकशाही वाचविण्याठी युवकांनी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली संघटीत व्हावे. महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातमध्ये नेण्याचे काम सुरु आहे. राज्यात बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. राज्यात आणि देशात व्देषाचे राजकारण सुरु आहे. त्यामुळे येत्या 21 मार्च रोजी विधानभवनाला महाराष्ट्रातील युवक काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते घेराव घालणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.
यावेळी युवक काँग्रेसचे प्रवक्ते दीपक राठोड, प्रभारी चंद्रशेखर जाधव, इमरान खान, धुळे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश गर्दे यांनी मनोगत व्यक्त केले.
युवा संवाद मेळाव्याला नंदुरबार जिल्हा प्रभारी किरण पाटील, नंदुरबार जिल्हाध्यक्ष निलेश पाटील, धुळे शहराध्यक्ष नावेद शेख, माजी प्रदेश सचिव राजीव पाटील, माजी जिल्हाध्यक्ष हर्षल साळुंखे, प्रदेश सरचिटणीस पंकज चव्हाण, सलमान मिर्झा, शिंदखेडा युवक काँग्रेस अध्यक्ष विजेंद्र पाटील, शिरपुर तालुकाध्यक्ष गेंद्या पावरा, योगेश देसले, सतिष रवंदळे, प्रा. मुकेश पाटील, चेतन शिंदे, अनिल जाट, विनोद गर्दे, निलेश पाटील, जयेश खैरनार, महेश पाटील, मुकेश पाटील, हिंमत बाचकर, साहेबराव वंजारा, भाऊसाहेब खंडेकर, अरुण पाटील, आबा पगारे, चेतन सोनवणे, रमेश सुर्यवंशी, योगश मासुळे, शिवाजी पाटील, अभय खैरनार, चंद्रकांत मराठे, सागर देसले, शरद मोरे, दिपक पाटील, भारत बागले, राहूल पवार, संजय गवळी, विवेक पाटील, प्रल्हाद पाटील, संदिप पाटील, हर्षल देसले, सागर मासुळे, विकास पाटील, जावेद शाह, विशाल पवार, प्रफ्फु खैरनार, सुमित पाटील, भुपेंद्र पाटील, बंटी पाटील, रुपेश पाटील, सागर खांडेकर, मुआज्जम हुसेन, हरिष पाटील, जावेद देशमुख, आसिफ अन्सारी, सरवर अन्सारी, हारिम अन्सारी यांच्यासह जिल्हातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.