The announcements of ‘Pension…Pension’ rocked the city!
‘पेन्शन… पेन्शन’च्या घोषणांनी शहर दणाणले!
Dhule News धुळे : राज्यातील १८ लाख कर्मचारी शिक्षक दिनांक १४ मार्चपासून बेमुदत संपावर आहेत. संपाच्या चौथ्या दिवशी शिक्षक, कर्मचाऱ्यांनी दुसऱ्यांदा महामोर्चा काढून शक्ती प्रदर्शन केले. ‘पेन्शन… पेन्शन’च्या घोषणांनी शहर दणाणले होते.
धुळे शहरात गुरुवारी कल्याण भवनपासून जेल रोडकडे महामोर्चाने कुच केली. कल्याण भवनपासून शिवतिर्थ, टॉवर बगीचा, आग्रा रोड, झाशी राणी पुतळामार्गे जेलरोडला मोर्चा आला. विविध संघटना आपापल्या संघटनांच्या बॅनर आणि ड्रेसकोडसह मोर्चामध्ये सहभागी झाले होते. ‘एकच मिशन जुनी पेन्शन’, “अभी नही तो कभी नही’, ‘पेन्शन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’, अशा अनेकविध घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला. या दरम्यान कमचारी, शिक्षकांमध्ये असलेल्या संतप्त ‘भावानांचा उद्रेक, घोषणाबाजीतून दिसून आला. तसेच पदाधिकाऱ्यांच्या मनोगतातून व्यक्त झाला. जुनी पेन्शन अभ्यास समिती शासन निर्णय, आऊट सोर्सिंगद्वारे एक लाख कर्मचारी, अधिकारी व शिक्षक कंत्राटी पद्धतीवर भरण्यासाठी खाजगी कंपन्यांना सेवाभरतीची ठेकेदारीचा झालेल्या शासन निर्णयाची होळी केली आहे. तसेच कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर असल्याची भुमिका घेत न्यायालयात याचिका दाखल केल्याबद्दल महिला कर्मचाऱ्यांनी वकील गुणवंत सदावर्ते यांच्या प्रतिमेचे दहन केले.
कर्मचारी शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे धोरण शासनाने जाहिर करावे या मागणीसाठी समन्वय समितीचा आग्रह असतांना सरकार जाणिवपूर्वक संपकऱ्यांना चिथावणी देऊन संप फोडण्याचा डाव रचत आहे. जुनी पेन्शन योजना स्विकारण्याची घाई करणार नाही असे सरकारने स्पष्ट केल्या कारणाने कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. याउलट बेमुदत संपाची यशस्वीता वाढली आहे.
क्युमाईन क्लब रस्त्यावर झालेल्या जाहीर सभेत समन्वय समितीचे निमंत्रक डॉ. संजय पाटील, सुकाणु समितीचे सदस्य बलराज मगर, सरकारी कर्मचाऱ्यांचे अशोक चौसरी, एस. यु. तायडे, सुधीर पोतदार, माध्यमिक शिक्षक संघटनेचे संजय पवार, शिक्षक संरक्षण समितीचे राजेंद्र नांद्रे, भुपेश वाघ, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे प्रा. बी. पाटील, शिक्षक समितीचे राजेंद्र पाटील, जि. प. आरोग्य कर्मचाऱ्यांचे डी. ए. पाटील, ग्रामसेवक संघटनेचे प्रभाकर भामरे, राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सुरेश पाईकराव, राजेंद्र माळी, दीपक रासने, सुरेश बहाळकर, भुषण पाटील, जि.प. कर्मचारी युनियनचे जयदिप पाटील, डी .एम. पाटील, किशोर पगारे, संजय गुंडलेकर, राहुल पवार, नरहर पाटील, ज्ञानेश्वर बाविस्कर आदींनी मनोगत व्यक्त केले. बेमुदत संप यशस्वी करु, मागण्या पदरात पडल्याशिवाय मागे हटणार नाही, असा निर्धार व्यक्त केला.