Ministry meeting on burning issues in Dhule city
धुळे शहरातील ज्वलंत समस्यांवर मंत्रालयात बैठक
Dhule News धुळे : शहरातील पाणीप्रश्नासह इतर ज्वलंत समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी येत्या २१ तारखेला मंत्रालयात बैठक होणार आहे, अशी माहिती आमदार डॉ. फारुख शाह mla farukh shah यांनी शनिवारी दिली. देवपूरात रस्ता आणि पुलाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
शहरातील देवपूर भागातील सुशीनाल्यावर विटाभट्टी गौसियानगरपासून पलीकडे जाण्यासाठी रस्ता व पूल नसल्यामुळे रहिवाशांची गैरसोय होते. पावसाळ्यात या भागातील नागरिकांना एक किलोमीटर फेरा मारुन पलीकडच्या भागात जावे लागत होते. यासंदर्भात प्रभाग तीनचे नगरसेवक सईद बेग, नासीर पठाण, गनी डॉलर यांनी पुलाचे बांधकाम करण्याची केली मागणी होती. त्याअनुषंगाने आमदार फारुख शाह यांनी तात्काळ दखल घेत आपल्या स्थानिक आमदार निधीतून निधी मंजूर केला होता. या पुलाच्या कामाचा शनिवारी आमदार फारुख शाह यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
शहरातील वेगवेगळ्या भागातील रस्ते, गटारी, पूल, पाण्याच्या पाईपलाईन संदर्भातील मुलभूत सुविधांसाठी आमदार फारुख शाह यांच्या प्रयत्नाने कोणताही भेदभाव न करता निधी उपलब्ध केला जात आहे. आजपर्यंतच्या आमदारांच्या कार्यकाळातील कामाचे व आमदार फारुख शाह यांच्या कार्यकाळातील कामाचे मूल्यमापन केल्यास आमदार फारुख शाह यांचे काम वरचढ होताना दिसत आहे.
या समारंभाला नगरसेवक नासिर पठाण, नगरसेवक सईद बेग, नगरसेवक गनी डॉलर, कैसर अहमद, फातेमा अन्सारी, रफीक शाह, शहजाद मन्सुरी, समीर मिर्झा, महेबुबा शेख, प्यारेलाल पिंजारी, एकबाल शाह, आसिफ शाह, शोएब मुल्ला, जमील खाटीक, इब्राहिम पठाण, आसिफ मुल्ला, अकीब अली, जुबेर शेख, नजर पठाण, फिरोज शाह, शहेबाज शेख, ओसामा शेख, खालिद पिंजारी, गुलाब नबी पिंजारी, तौफीक शेख, समीर पिंजारी सिद्धीक शेख, माजीद काझी व कार्यकर्ते उपस्थित होते.