MLAs Support State Govt Employees Strike
राज्य सरकारी कर्मचारी संपाला आमदारांचा पाठिंबा
Dhule News धुळे: जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे.
दरम्यान, धुळे येथे संपाच्या पाचव्या दिवशी आमदार डॉ. फारुख शाह यांनी क्युमाईन क्लब येथे आंदोलनस्थळी भेट दिली आणि संपाला पाठिंबा दिला. टोकाची भूमिका न घेता कर्मचाऱ्यांनी संयमाने संप सुरू ठेवावा. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत आपण सरकारसोबत चर्चा करणार आहोत, असे आश्वासनही त्यांनी दिले.