caught Gutkha worth 98 lakhs
Dhule Crime ९८ लाखांचा गुटखा पकडला
Dhule धुळे: महाराष्ट्र राज्यात गुटखाबंदी असताना देखील इतर राज्यातून तस्करी करून धुळे जिल्ह्यात विक्रीच्या उद्देशाने आणलेला तब्बल ९८ लाख रुपये किंमतीचा गुटखा धुळे पोलिसांनी सोमवारी रात्री पकडला.
सहायक पोलीस अधीक्षक ऋषीकेश रेड्डी यांच्या पथकाने ही कारवाई केली. Ips रेड्डी यांना गुटख्याच्या वाहतुकीबाबत माहिती मिळाली होती. रात्री पेट्रोलिंगच्या दरम्यान त्यांनी निमडाळे ता. धुळे शिवारात दोन आयशर गाड्या अडविल्या. त्यात हा साठा आढळून आला. ९८ लाखांचा गुटखा, दोन आयशर, एक कार असा सुमारे एक कोटी ३३ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल देवपूर पश्चिम पोलीस ठाण्यात जप्त केला आहे. वाहनांवरील चालक आणि इतरांना अटक केली आहे.
जिल्हा पोलीस अधिक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे धुळे शहर उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक एस. ऋषीकेश रेड्डी, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय उजे, हेड कॉन्स्टेबल कबीर शेख, चंद्रकांत जोशी, रमेश उघडे, मंगा शेमले, प्रशांत पाटील, चंद्रकांत पाटील, कर्नल बापु चौरे, शरद पाटील यांनी ही कारवाई केली आहे. अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी अधिक माहिती दिली.