There are temples of Rama in every village, why not of Lord Eklavya? Tribal aggressors
गावागावात रामाची मंदिरे होतात, भगवान एकलव्यांची का नाही? आदिवासी आक्रमक
Dhule News धुळे: गावागावात रामाची मंदिरे होतात. परंतु भगवान एकलव्य यांच्या मुर्तीला विरोध का केला जातोय, असा संतप्त सवाल करीत जिल्ह्यातील आदिवासींनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. गावागावात भगवान एकलव्य यांची मूर्ती स्थापन करण्याची परवानगी द्यावी, अशी त्यांची मागणी आहे.
याबाबत आदिवासी क्रांती सेना प्रणित बापजी ग्रुपने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. याविषयी संघटनेचे अध्यक्ष भरत जाधव आणि पत्रकार भरत देवरे यांनी अधिक माहिती दिली.