I MLA of Sarva Dharmias, gave funds for the protective wall of Mahadev temple
Farukh shah: मी सर्व धर्मियांचा आमदार, महादेव मंदिराच्या संरक्षक भिंतीसाठी दिला निधी
Dhule News धुळे: मी सर्व धर्मियांचा आमदार आहे. शहरातील विविध मंदिरांसाठी निधी मंजूर केला आहे, असे स्पष्ट करीत आमदार डॉ. फारुख शाह यांनी जातीयवादाच्या मुद्यावर बोलताना सादर केलेल्या शायरीला उपस्थितांनी टाळ्यांच्या आवाजात दाद दिली.
देवपूरातील सदाशिवनगरात लोकसहभागातून साकारत असलेल्या महादेव मंदिराच्या संरक्षक भिंतीसाठी पत्रकार महेश घुगे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी आमदार फारूक शाह यांच्याकडे एका निवेदनाद्वारे मागणी केली होती. आमदार शाह यांनी आपल्या स्थानिक निधीतून सरंक्षक भिंतीसाठी निधी मंजूर केला होता. गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर समई प्रज्वलित करून आमदार शाह यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला. धुळे शहरातील वेगवेगळ्या भागातील रस्ते, गटार, पुल व पाण्याच्या पाईपलाईन संदर्भात मुलभूत सुविधांसाठी आमदार फारुख शाह यांच्या प्रयत्नाने कोणताही भेदभाव न करता निधी उपलब्ध केला जात आहे. आजपर्यंतच्या आमदारांच्या कार्यकाळातील कामाचे व आमदार फारुख शाह यांच्या कार्यकाळातील कामाचे मूल्यमापन केल्यास आमदार फारुख शाह यांचे काम वरचढ होताना दिसत आहे.
या कार्यक्रमाला पत्रकार महेश घुगे, नगरसेवक नंदु सोनार, गनी डॉलर, डॉ. जगदीश गिंदोडीया, डॉ. दीपश्री नाईक, इंजि. पराग अहिरे, कार्यकारी अभियंता ओस्तवाल, ह.भ.प. महेंद्र महाराज, निजाम सय्यद, प्यारेलाल पिंजारी, एकबाल शाह, शहजाद मन्सुरी, आसिफ शाह, सुलेमान मलिक, ताराचंद माळी, शामकांत पवार, शिवाजी देवांग, इंदुबाई माळी, जितु शिंदे, उमाताई घुगे, रजनी देशमुख, छाया सोनावणे, छाया कासार, लक्ष्मीकांत गीते, मिलिंद देशमुख, दीपक बेडसे, संदीप माळी, योगेश कासार, मिलिंद भामरे, सुहास ओगले व परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते.