Thousands of Shiv Sainiks will go for Uddhav Thackeray’s meeting in Malegaon
उध्दव ठाकरे यांच्या मालेगांवच्या सभेसाठी हजारो शिवसैनिक जाणार
Shivsena News शिंदखेडा : येत्या 26 मार्च रोजी शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची सभा मालेगांव होणार आहे. सदर सभेच्या नियोजनासाठी धुळे जिल्हा संपर्कप्रमुख अशोक धात्रक यांचे उपस्थितीत शिंदखेडा येथे जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात शिवसेना-युवासेना व इतर संलग्न संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी पदाधिकारी व शिवसैनिकांनी हजारोंच्या संख्येने येण्याचे प्रतिपादन संपर्कप्रमुख अशोक धात्रक, सहसंपर्कप्रमुख हिलाल माळी व जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांनी केले.
यावेळी जिल्हा संघटक मंगेश पवार, जिल्हा समन्वयक डॉ. भरत राजपुत, उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, भरतसिंह राजपुत, युवासेना जिल्हा युवाधिकारी आकाश कोळी, विधानसभा क्षेत्रप्रमुख गणेश परदेशी, दोंडाईचा कृ.उ.बा.स. संचालक सर्जेराव पाटील, उपजिल्हा संघटक कल्याण बागल, तालुकाप्रमुख गिरीश देसले, ईश्वर पाटील, अत्तरसिंग पावरा, माजी जि. प. सदस्य छोटु पाटील, विश्वनाथ पाटील, तालुका संघटक डॉ. मनोज पाटील, शानाभाऊ धनगर, शहरप्रमुख संतोष देसले, संतोष माळी, शैलेश सोनार, मनोज पवार, चंद्रसिंग ठाकूर, गुलझारसिंग गिरासे, भटु अहिरे, राजु कोळी, संजय पहाडी, मनोहर राजपुत, प्रदीप पवार, लक्ष्मीकांत साळुंके, ॲड. ज्ञानेश्वर पाटील, राजेंद्र पवार, आर. आर. पाटील, विकास सेन, जितेंद्र राठोड, मुकेश शेवाळे, योगेश सुर्यवंशी यांच्यासह शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.
पक्षात प्रवेश
छत्रपाल पारधी, अशोक तावडे, मनीष बैसाणे, समाधान मोरे, कुणाल महाजन, अजय पाकले, कुणाल सोनवणे, भुषण तावडे, विक्की खलाणे, अजय तमखाने, अक्षय तावडे, अजय कुंवर, भावेश भोई, अक्षय भोई, जितेंद्र पारधी, अर्जुन पारधी, गणेश कोळी, दिनेश कैकाले, आकाश माळी, विनोद जावळे, दिनेश पाटील, आकाश कोळी, निखिल भोई, चेतन कोळी, विजय भिल, सुन्नी बोरसे, दिनेश सोनवणे, विशाल भामरे, अनिकेत भामरे, पंकज तावडे, राकेश भोई, शुभम तावडे, अनिल मराठे, मुकेश कोळी, धनराज ईशी, चेतन गावडे यांनी प्रवेश केला.
या प्रवेशासाठी जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके व विधानसभा संघटक गणेश परदेशी यांनी प्रयत्न केले. यावेळी सहसंपर्कप्रमुख हिलाल माळी, जिल्हा संघटक मंगेश पवार, उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, सर्जेराव पाटील, तालुकाप्रमुख अत्तरसिंग पावरा यांनी मनोगत व्यक्त केले. आभार माजी तालुकाप्रमुख विश्वनाथ पाटील यांनी मानले. सुत्रसंचालन युवासेनेचे जिल्हा युवाधिकारी आकाश कोळी यांनी केले.