Public awareness of water conservation through street theater
पथनाट्यातून जल संवर्धनाची जनजागृती
jagtik jal din धुळे: जिल्ह्यातील चितोड, रावेर, दह्याने, बल्हाने, उडाने या गावांमध्ये पथनाट्याच्या माध्यमातून जल संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात आली.
मातोश्री गुंताबाई आखाडे बहुउद्देशीय संस्था, महिंदळे व नेहरू युवा केंद्र धुळे neharu yuva kendra यांच्या संयुक्त विद्यमाने जल दिनानिमित्त पाणी संवर्धन या विषयावर प्रतिष्ठा कलापथकाच्या कलावंतांनी २३ मार्च रोजी पथनाट्य सादर केले.
पाणी संवर्धन काळाची गरज आहे. पृथ्वीतलावावरील मानवासह प्राण्यांना आणि प्रत्येक जीवाला माहित आहे की ‘जल हि जीवन है’ कारण पाण्याशिवाय कोणीही जगू शकणार नाही. म्हणूनच पाण्याच्या स्त्रोतांचे संरक्षण करणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. वाढत्या लोकसंखेच्या प्रमाणात वाढत्या पाण्याची दरडोई उपलब्धता वरचेवर घसरत चाललेली आहे. म्हणून पाणी काटकसरीने वापरण्याबाबत जनजागृती करणे महत्वाचे आहे. हाच एक विचार मनात घेऊन मातोश्री गुंताबाई आखाडे बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष डॉ. डी. एम. आखाडे व नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक मेघवाल यांनी गावांमध्ये पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती व्हावी यासाठी परिश्रम घेतले. तसेच गावांमधील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. प्रतिष्ठा कलापथकाचे सचिन पाटील, योगेश कोळपे, मयूर पाटील, तुषार भारती, ऐश्वर्या मोरे, प्रज्ञा हिवाळे, सायली निकम, प्रतिभा पवार, भाग्यश्री पवार यांनी पथनाट्य सादर केले.