Rahul Gandhi: What is the actual case?
राहूल गांधी: नेमकं प्रकरण आहे तरी काय?
rahul gandhi धुळे: राहुल गांधी प्रकरणावरून सध्या राजकारणात रणकंदन माजले आहे. हे प्रकरण नेमके आहे तरी काय?
२०१९ लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत एक वक्तव्य केलं होतं. कर्नाटकमध्ये झालेल्या राहुल गांधी यांच्या एका जाहीर सभेत म्हणाले होते की, ‘नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी यांच्या आडनावांमध्ये समान धागा काय आहे? सगळ्या चोरांची आडनाव मोदी अशीच का?’ राहुल यांच्या या वादग्रस्त वक्तव्याविरोधात सुरतमधील जिल्हा न्यायालयात खटला दाखल केला होता. राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींचा अपमान केल्याचा दावा याचिकेत केला होता याप्रकरणावर गुरुवारी न्यायालयाने राहुल गांधी दोषी असल्याचं सांगत त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. हा निर्णय जाहीर करताना राहुल गांधी यांना याविरोधात दाद मागण्याचा मार्ग खुला आहे. राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली गेल्यामुळे त्यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय लोकसभा अध्यक्षांनी जाहीर केला.
काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्याने देशभरात काँग्रेस आक्रमक झाली आहे.
दरम्यान, धुळे शहरात मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
राहुल गांधी यांनी लंडनमध्ये केलेले वक्तव्य आणि अदानी समूहाच्या मुद्यावरून विरोधक आणि सत्ताधारी पक्ष भाजप यांच्यात संसदेत संघर्ष सुरूच आहे. अशातच त्यांची खासदराकी गेल्याने काँग्रेसला मोठा धक्का आहे. सुरत कोर्टाने त्यांना 2 वर्षांची शिक्षा दिल्याने त्यांची खासदारकी रद्द झाली आहे. याबाबत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.
तत्पूर्वी धुळे शहरात महानगरपालिकेसमोर तेली समाजाने राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून जोरदार घोषणाबाजी केली. मोदी समाज अर्थात तेली समाज चोर आहे, असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केल्याचा आरोप करीत त्यांचा निषेध केला. तेली समाजाने आयोजित केलेल्या या जोडे मारा आंदोलनात महापौर प्रतिभा शिवाजीराव चौधरी, माजी महापौर जयश्री अहिरराव सहभागी झाल्या होत्या.